Back
मोहाडी शहरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली, CCTV कॅमेऱ्यात कैद!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0607_BHA_THIEF_CCTV
FILE - 1 VIDEO
मोहाडी शहरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली.... दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद....
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे चोरट्यांनी दोन दुकाने फोडली आहे. मोहाडी शहरातील सिराज मोबाईल शॉप, व मोटघरे हार्डवेअर येथे रात्रीच्या दोनच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुकानाचा शटर तोडून आता शिरले. दुकानात काही रोख रक्कम मिळते का म्हणून शोधाशोध करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. शेवटी चोरट्यांनी काही मुद्देमाल चोरून नेला असून सकाळी नागरिकांना दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याने लागलीच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मोहाडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या औंढा येथील वनविभागाच्या गोकर्णा माळराणावर असलेल्या गोकर्णा महादेवाची आषाढी एकादशी निमित्ताने यात्रा भरत असते. गोकर्णा महादेवाची यात्रा ही आषाढी एकादशीलाच भरते. गोकर्णा माळराणावरील उंच डोंगरावर गोकर्ण महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे. औंढा पंचक्रोशीतील भाविक भक्त या गोकर्णा महादेवाच्या दर्शनासाठी सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी होत असते. आज आलेली रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशी असा दुहेरी योग साधून हजारो भाविकांनी गोकर्णा महादेवाचे दर्शन घेतले. वन विभागाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात हे धार्मिक स्थळ असल्याने येथे पंचक्रोशीतील भाविक डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. सोबत फराळाचे साहित्य आणून वनभोजनाचा सुद्धा आनंद घेत असतात.
हर हर... महादेवाच्या गजराने माळरान दुमदुमून गेले. येथे पोलिसांक कडक बंदोबस्त ठेवला होता.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_dam
Nashik breaking
- नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला
- गंगापूर, दारणा, आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग आला वाढवण्यात
- गंगापूर धरणातून 5186 क्यूसेस तर दारणा धरणातून 9932 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
- तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडी कडे 27 हजार 980 क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- कालपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू आहे संततधार पाऊस
- पाऊस सुरूच राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल प्रशासनाकडून माहिती
- जिल्ह्यातील इतरही वेगवेगळ्या धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग
Dam discharge figure
Darna - 9932 Cusec
Gangapur - 5186 Cusec
N M Weir - 27980 Cusec
Palkhed - 646cusec
Punegaon - 100 cusec
Bhojapur - 76 cusec
Bhavli - 701 cusec
Bham - 3522 cusec
Waki - 505 cusec
Waldevi - 65 cusec
Aalandi- 30 cusec
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली. आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते सकाळी महापूजा पार पडली.दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेता. विठुराया द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता. अशी आख्यायिका आहे. विठ्ठलाच्या सर्व मुर्त्या दोनही हात कंबरेवर असलेल्या आहेत. मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कंबरेवर तर उजवा हात खाली आहे. याच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगाव येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
१२१
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_rescue
Nashik breaking
- *पाण्याचा विसर्ग वाढविल्यानं रामकुंडात रात्री अडकला होता तरुण*
- पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा घेतला आधार
- स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने तरुणाला काढले बाहेर
- गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं तरुणाची झाली होती फजिती
- तरुणाला सुखरूप बाहेर काढल्याने दुर्दैवी घटना टळली
0
Share
Report
Vasai-Virar, Maharashtra:
Date-6july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ART
Feed send by 2c
Type-AV
Slug- नारळामध्ये विठ्ठलाचे दर्शन
वसईतील कला शिक्षकाची कलाकृती
अँकर - वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी आषाढी एकादशी निमित्त *नारळा मध्ये *विठ्ठलाचे* चित्र रेखाटले आहे... वॉटर कलरचा वापर करून हे चित्र 30 मिनीटांमध्ये बारकाईने रेखाटले आहे.देव चरा चरा मध्ये. आहे... हे या चित्रातून कौशिक जाधव यांनी दाखवले आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - दक्षिण रायगडमधील धबधब्यांवर निर्बंध ..... निर्बंधांच्या धबधब्यांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त .......
अँकर - पावसाळी पर्यटन स्थळ, धबधब्यांवर पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमध्ये प्रसिद्ध आणि धोकादायक धबधबे, नद्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पोलिस पर्यटकांना पुढे जाण्यास अटकाव करण्याचे काम करीत आहेत. यानंतर ही पर्यटक धोकादायक ठिकाणी पर्यटन करताना दिसले तर कारवाई केली जाणार आहे.
0
Share
Report
Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Prati Pandharpur
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: आषाढी वारी सोहळ्यानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार माऊली कटके यांनी सहपत्नी महापूजा करत लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतलं यावेळी आषाढी एकादशीनिमित्त मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध रंगीत फुलांनी सजविण्यात आला असून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे....
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: खासगी कोचिंग क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; पवार, खाटोकरवर दुसरा गुन्हा दाखल
Anc- शहरातील उमीकरण या खासगी क्लासेसमधील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान दुसऱ्या पालकाने लैंगिक छळाची तक्रार दिल्यानंतर आता शिवाजी नगर पोलिसांत आणखीन एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आरोपी पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पालकाच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदनुसार गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरात गाड्यांची तोडफोड; नागरिक भयभीत
मध्यरात्री नशेत धुंद टवाळखोरांनी 7 ते 8 गाड्यांच्या कचेवर दगड मारून केली तोडफोड...
तोडफोडीत मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
तोडफोड करणाऱ्या टाळकरांचा पोलीस घेत आहे शोध
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop School Vithoba
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे मधील न्यू हायस्कूल मध्ये आषाढी निमित्त विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमा अंतर्गत वेशभूषा, उपवासाचे पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात ४५ प्रकाराहून अधिक उपवासाच्या खमंग व चटपटीत पदार्थ बनवून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली.
0
Share
Report