Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

गोकर्णा महादेवाची यात्रा: भक्तांची गर्दी, निसर्गात अद्भुत अनुभव!

GAJANAN DESHMUKH
Jul 06, 2025 08:35:08
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोलीच्या औंढा येथील वनविभागाच्या गोकर्णा माळराणावर असलेल्या गोकर्णा महादेवाची आषाढी एकादशी निमित्ताने यात्रा भरत असते. गोकर्णा महादेवाची यात्रा ही आषाढी एकादशीलाच भरते. गोकर्णा माळराणावरील उंच डोंगरावर गोकर्ण महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे. औंढा पंचक्रोशीतील भाविक भक्त या गोकर्णा महादेवाच्या दर्शनासाठी सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी होत असते. आज आलेली रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशी असा दुहेरी योग साधून हजारो भाविकांनी गोकर्णा महादेवाचे दर्शन घेतले. वन विभागाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात हे धार्मिक स्थळ असल्याने येथे पंचक्रोशीतील भाविक डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. सोबत फराळाचे साहित्य आणून वनभोजनाचा सुद्धा आनंद घेत असतात. हर हर... महादेवाच्या गजराने माळरान दुमदुमून गेले. येथे पोलिसांक कडक बंदोबस्त ठेवला होता.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement