icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

यवत में ओबीसी मोर्चे को पुलिस ने अनुमति नहीं दी, हाके ने रुख दिखाया

Rui, Maharashtra:ओबीसींच्या मोर्चा मुंबईकडे एक सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. पोलीसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी नाकारली असून लक्ष्मण हाके यांना नोटीस दिली गेली आहे. यवत पोलीस ठाण्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. आम्ही मोर्चावर ठाम असून मुंबईकडे जाणार असल्याचे हाके यांनी म्हटले. जरांगे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारला त्यांनी आरक्षण दिले असल्यामुळे मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील आझाद मैदान येथे पोलिसांची परवानगी आवश्यक असून ती मिळाली नाही त्यामुळे हाके यांच्या मोर्चाला अद्याप परवानगी दिली नाही. ज्या गाड्या या मोर्चाला जाणार आहेत त्यामुळे कायदा व्यवस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; नव्याने अर्ज करून मागणी करण्याचा विचार दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी व्यक्त केला.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अनुमति न मिलने के बावजूद ओबीसी महामोर्चा 1 सितंबर को पटस से मुंबई रवाना

Pune, Maharashtra:परवानगी नाकारली तरीही १ सप्टेंबरचा ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणारच असा निर्धार ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. तसेच नियोजनात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक तारखेला सकाळी दहा वाजता ओबीसी समाजबांधवांनी पाटस टोल नाक्यावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही हाके यांनी केले आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विविध प्रश्नावरती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाने महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा पाटसहून निघणार असून तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र सोशल मीडियामध्ये काही ओबीसी समाजाचे विरोधक या मोर्चा संदर्भात अफवा पसरवत आहेत. असा आरोप हाकेंनी केला दरम्यान पाटस येथे पोलीस प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाली असून कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत हा मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

सरकार ओबीसी-मराठा आरक्षण मुद्दे पर सकारात्मक बातचीत कर रही है

Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन जरांगे पाटील उपोषण... सरकार तोडगा... विखे पाटील जरांगे यांच्याशी बोलता येत सरकार जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. एक-दोन दिवसात तोडगा निघेल... ऑन खासदार सुप्रिया सुळे पक्ष स्थापना.. पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल... ऑन लक्ष्मण हाके ओबीसी मोर्चा मुंबई हाके यांच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा होईल मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल ऑन सुनेत्रा पवार निवडणूक मध्यस्थी लक्ष्मण हाके राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहे तो जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल, ऑन छगन भुजबळ छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करू ओबीसी आणि मराठा यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबाबत सरकार सकारात्मक आहे. जातीय सलोखा जपलं पाहिजे गुण्या गोविंदाने काम केलं पाहिजे सरकारची भूमिका ऑन हाके आरक्षण गेलं लखा्मण हाके आणि भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून समजून घेईल ऑन जरांगे पाटील मागणी प्रमुख विखे पाटील यांना जबाबदारी दिली है ते यातून नक्की तोडगा काढतील... ऑन कर्जमाफी यादी कागदपत्र जसे पूर्ण होतील केवायसी पूर्ण होतील त्याप्रमाणे यादी लागतील शेतकरी बांधवांना सांगतो काळजी करू नका सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिला आहे ते नक्की पूर्ण होईल... शेतकरी अडचणीत आहे पाऊस पडत नाही... चार आठ दिवसात पाऊस नाही पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल... पिकावर शेतकऱ्याने स्वप्न रंगवले आहेत ऑन बायोमेट्रिक कोणालाही वंचित ठेवणार नाही .. ऑन मयत शेतकरी मयत शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वंचित ठेवणार नाही... ऑन सुप्रिया सुळे शेतकरी कंबरड मोडलं याबाबतीत मी माहिती घेतली नाही माहिती घेतल्यावर मी बोलेल.... ऑन सुप्रिया सुळे सरकार धोरण ताई देशाच्या ज्येष्ठ नेते आहेत ते काय बोलल्या ते मी ऐकून घेतले नाहीत.... माहिती घेतल्यावर मी त्यावर बोलेल...
0
0
Report

पुणे महापालिका के कनिष्ठ इंजीनियर भर्ती पेपर लीक: पुनःपरीक्षा की मांग

Pune, Maharashtra:कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा; फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पुरावे समोर आल्यानंतर तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “तीन उमेदवारांवर कारवाई झाली म्हणजे गैरप्रकार केवळ त्यांच्यापर्यंत मर्यादित होता, असे कसे मानता येईल? प्रश्नपत्रिका आणखी किती जणांपर्यंत पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची सखोल चौकशी झाली आहे का? त्याच निकालाच्या आधारे नियुक्त्या करणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,” असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात महापालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत खात्रीदायक माहिती असल्याचा दावा करत, “प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावर असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही. भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेतली नाही, तर तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.
0
0
Report

पुणे में गणेशोत्सव के दौरान ध्वनि प्रदूषण रोकथाम की मांग, नागरिक मोर्चा निकला

Pune, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सव डिजेमुक्त व्हावा, यासाठी अभिनव चौकात काही जागरूक पुणेकर जमा झालेत. डिजे आणि डॉल्बीच्या आवाजाला आता सहन होत नाही तो बंद झालाच पाहिजे असे या ज्येष्ठ नागरिका्चा म्हणणं होतं. आयोजक संघटनेनं आजचा मोर्चा रद्द केला असूनही पुणेकर डिजेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. अभिनव चौक ते शनिवारवाडा हा मोर्चा निघत आहे. ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी केली जावी, एवढीच आमची मागणी आहे. सण उत्सवात ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. उत्सव हवा प्रदुषण नको.
0
0
Report
Advertisement

पुणे में ध्वनि प्रदुषण पर विद्यानंद बापट की भाषा, गणेश मंडळों का विरोध कायम

Pune, Maharashtra:ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकरांनी आवाज उठवल्याबद्दल व्हिसल ब्लोअर विद्यानंद बापट यांनी आनंद व्यक्त केलाय...पण गणेश मंडळांनी टोकाचा विरोध करूनही ते लाउडस्पीकर बंदी आणि रस्त्यात मंडप न टाकण्याच्या भूमिकेवर आजही ठाम आहेत...गणेश मिरवणुका थेट रिंगरोड नेण्यात याव्या, या त्यांच्या अतिशय टोकाच्या भूमिकेवर गणेश मंडळांकडून प्रचंड टीका झाली पण विद्यानंद बापट आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...त्यांचं साधं म्हणणंय की, तुमच्या सण उत्सवाचा इतरांना ञास नको, पाहूयात पुण्यातील ध्वनीप्रदुषण लढ्याचा आवाज बनलेले विद्यानंद बापट नेमकं काय म्हणतात ते...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...
0
0
Report
Advertisement

पुणे में गणेशोत्सव के ध्वनि प्रदुषण के खिलाफ नागरिकों की रैली

Pune, Maharashtra:पुण्यात आज गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकर उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळाले, ज्येष्ठ नागरिकांनी तर अभिनव चौक ते शनिवारवाडा असा मोर्चाही काढला इकडे गुडलक चौकातही डिजेमुक्तीचा आवाज घुमला....पाहुयात पुण्यात ध्वनीप्रदुषणावरून कसं रण पेटलंय ते...उत्सव हवा पण प्रदुषण नको संघटनांनी मोर्चा रद्द करूनही पुणेकर उतरले रस्त्यावर...व्हीओ...पुणे पालिकेत विद्यानंद बापट यांना गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर काढल्यापासून पुण्यात डिजेविरोधातला आवाज चांगलाच वाढू लागलाय...विशेष म्हणजे आंदोलन पुकारणाऱ्या संघटना गणेश मंडळांना मॅनेज होऊनही सामान्य पुणेकर स्वयंस्फुर्तिने रस्त्यावर उतरले...अभिनव चौकातून शनिवार वाड्यावर मोर्चा काढलेल्या ज्येष्ठ पुणेकरांची मागणी अतिशय साधी सिंपल होती, ध्वनीप्रदुषण कायद्याचीं अंमलबजावणी करा, एवढीच त्यांची मागणी होती पुण्यात डिजे विरोधात एवढा आवाज घुमूनही डिजे समर्थक गणेश मंडळं माञ, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...डिजे हा वाजणारच अशी भूमिका वडारवाडीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष उदय महाले यांनी मांडली...तुम्हाला ढोलताशाचे ध्वनी प्रदुषण चालते मग डिजेचाच काय ञास होतोय, आणि मुळात पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरणारे आम्हाला ढोल पथकं आणून देणार आहेत का? आणि तेवढी ढोलपथकं आहेत का? असे परखड उलट सवाल माजी नगरसेवक उदय महाले विचारतात...डीजे विरोधापेक्षा समर्थकांची संख्या जास्त असल्याचा दावा ही महाले करतात...दरम्यान, पुणे गणेशोत्सवात वाढलेल्या या ध्वनी प्रदुषणाला तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी केलाय...कोविडनंतर एकनाथ शिंदे सीएम म्हणून पुण्यात आले आणि निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा करून गेले, तेव्हापासून पुणेकरांना या उत्सव कालीन ध्वनीप्रदुषणाचा ञास सहन करावा लागताय, असं संभोस म्हणतात. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही या डिजेवादात उडी घेतलीय, लाउडस्पीकर विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे दमबाजी करत असतील तर सामान्य पुणेकरच भाजपला सत्तेतून खाली खेचतील, असा इशारा जगताप देतात व्हीओ..."डिजे आवाज वाढव तुला आयची शपथ हाय..." हे गाणं तुम्ही ऐकलंत असेल पण पुण्यात याच डिजेवरून रण पेटल्याचं बघायला मिळतंय...पण याच वादाला डिजे विरूद्ध ढोलताशा या पारंपरिक वाद्य पथकांच्या अंतर्गत स्पर्धेची किनार असल्याचं ऐकायला मिळतेय...पण ध्वनी प्रदुषणाच्या या दणदणाटात राजकीय कार्यकर्त्यांचा व परस्परविरोधी कलकलाट भलताच वाढल्याचा बघायला मिळतोय...
0
0
Report

पाबळ में नए MIDC के विरोध के बीच प्रशासन ड्रोन सर्वे किया; किसान अड़े

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ, खैरेनगर आणि धामारी परिसरातील ७४३ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या नव्या एमआयडीसीला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रात्रीच्या अंधारात ड्रोन सर्व्हे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, 'एक गुंठाही जमीन देणार नाही' असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. ही सर्व जमीन बागायती आणि सुपीक असून जबरदस्तीने भूसंपादन केल्यास आत्मदहनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. याच संदर्भात ग्रामस्थांनी परिसरात सर्वत्र विरोधाचे बॅनर लावले असून आज खैरेवाडी ग्रामस्थांनी बैठक घेत शासनाचा तिव्र विरोध केलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड रोजगार मेळा उद्घाटन के बाद सरकार पर चर्चा तेज

Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने वेळो वेळी ऐकल्या आहेत, मान्य ही केल्या आहेत, आता ही सरकार चर्चा करत आहे, त्यातून मार्ग निघेल अस विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर यांनी म्हटलंय...! पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेच्या वतीन आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आहीर यांच्या हस्ते झाले. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते...! जरांगे यांच्या ठराविक अंतराने होणाऱ्या उपोषणसंबंधी बोलताना ते उपोषणाला बसणे योग्य होते की नव्हते हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे अस सांगतानाच जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ऐकल्या आहेत आणि त्यातून मार्ग निघेल अस ते म्हणाले. मुंबई महानगर पालिकेमध्ये शहर सुधारणा समिती वरून भाजप सेने मध्ये होत असलेल्या वादावर बोलताना, हा वाद नाही प्रत्येक जण पक्षाचे प्रतिनिधित्व मागत असेल तर त्याला वाद म्हणत नाहीत, प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्यातून मार्ग निघेल अस अहिर यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी नकाराची स्पष्ट भूमिका घेण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनीच उत्तर दिले मी काय बोलणार अस अहिर म्हणाले. प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व टिकवायचे असते ते दोन्ही पक्ष करणार अस ही ते म्हणाले...रिक्षा चालकाना मराठी शिकणाऱ्या संबंधी एक वर्षाची वाढीव मुदत दिली असली तरी आमचे काम थांबले नाही... ते पुढे ही सुरू राहील अस ते म्हणाले...! Byte - सचिन अहिर, उपसभापती, विधान परिषद
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top