Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड: खासगी क्लासेसमधील लैंगिक छळ प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल!

Mahendrakumar Mudholkar
Jul 06, 2025 08:01:25
Beed, Maharashtra
बीड: खासगी कोचिंग क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; पवार, खाटोकरवर दुसरा गुन्हा दाखल Anc- शहरातील उमीकरण या खासगी क्लासेसमधील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान दुसऱ्या पालकाने लैंगिक छळाची तक्रार दिल्यानंतर आता शिवाजी नगर पोलिसांत आणखीन एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आरोपी पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पालकाच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदनुसार गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement