Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

नेवासा: ७५ लाखांचा वाळू साठा जप्त, ३ अटक!

Kunal Jamdade
Jun 27, 2025 06:01:22
Shirdi, Maharashtra
Anc - नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. नेवासा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या या अवैध उत्खननात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने छापा मारत केलेल्या कारवाईत १ जेसीबी, ६ ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात वाळू साठा असा सुमारे ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून प्रविण म्हस्के, विशाल ठोंबरे आणि अभिषेक जाधव या तिघांना अटक केली असून, इतर ६ आरोपी फरार आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे. Bite - संतोष खाडे , परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement