Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळे विश्रामगृहात सापडली 1.84 कोटीची रोकड, न्यायालयाने दिले चौकशीचे निर्देश!

PRASHANT PARDESHI
Jun 27, 2025 11:34:38
Dhule, Maharashtra
Anchor - धुळे जिल्ह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी कलम 175 (3) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश धुळे न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली होती. कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडून देखील पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने माजी आमदार अनिल गोटे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी धुळे न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाची दखल घेत धुळे न्यायालयाने BNSS चे कलम 175/3 नुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश धुळे पोलिसांना दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास आपण औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून गुन्ह्यात धुळे पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी करणार असल्याचे अनिल गोटे यांनी म्हांटल आहे. Byte- अनिल गोटे माजी आमदार प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement