Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

फसवणुकीचा नवीन ऑनलाइन फंडा: लग्नाचे आमिष!

YOGESH KHARE
Jun 27, 2025 10:05:47
Nashik, Maharashtra
nsk_lovejihad fed by 2C and mojo vidoe 5 image 5 फसवणुकीचा नवीन ऑनलाइन फंडा ऑनलाईन वेबसाईटवर हर्षवर्धन बनून लग्नाचे आमिष फसवणुक करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ठोकल्या बेडया. मुंबईनाका पोलीसांची उल्लेखनीय कारवाई अँकर सध्या राज्यामध्ये फसविण्यासाठी ऑनलाईन matrimonial साईट्सचा वापर करून मुलींना फसविले जातेय. मुंबई नाशिक पुणे अशा उपनगरांमध्ये हिंदू नावे वापरून मुलींना जाळ्यात ओढले जातेय त्यांची आर्थिक मानसिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना वाऱ्यावर सोडले जातेय नाशिकमध्ये अशाच एका घटनेत हा सर्व प्रकार समोर आलाय. Vo 1 वय २६ वर्षे ...मुंबईतील माहिम उपनगरात राहणारा हा आहे हर्षवर्धन पाटील.. राज्यातल्या अनेक matrimonial वेबसाईट वर इच्छुक वर म्हणून हर्षवर्धनचे आर्किटेक्ट म्हणून त्याचा प्रोफाइल आहे.. बडेजाव मोठ्या घरचा...आपल्या पालकांशी इच्छुक तरुणीच्या पालकांशी बोलणी करूनही विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर भावनिक जाळ्यात अडकवून बिझिनेस वूमन ची स्वप्ने दाखवायची... या वर्षी पाच महिन्याच्या कालात त्याने असेच एक मुलीला जाळ्यात ओढले ..तिला मोठमोठी स्वप्ने दाखवत शारीरिक शोषण केले आणि त्याच बरोबर व्यवसाय करू असे संगत कर्ज काढून लाखो रुपये लाटले..इतकेच नाही तर कार बुलेट घेत मुलीला फसविले Byte 1 जितेंद्र वाघ तपासाधिकारी मुंबई नाका पोलिस Vo 2 अस्खलित मराठी बोलत फसविणारयाच खरे नाव आहे मुस्तफा जागीलकर... त्याने मुंबईत नाशिकमध्ये अनेक मुलींना फसविले आहे.अगदी सध्या लग्न केलेल्या त्याच्या बायकोला सुद्धा असेच फसविल्याने बायकोनेही मुलींना आपला निकाआह नामा दाखवित त्याचे खरे रूप उघड करण्यास सुरुवात केलीय. तर काही पीडिता पुढे आल्याने नाशिक पोलिस आता गंभीरपणे याचा तपास करतायत Byte पीडिता पीडिता Vo 3 या व्यक्तीने आतापर्यंत तीस मुलींना फसविले असल्याच प्राथमिक तपासात समोर आले आहे. यात धार्मिक परिवर्तन केले असू शकते अशी पोलिसांना शंका आहे. आतापर्यंत किमान तीन कोटींची फसवणूक विविध माध्यमातून केल्याच समोर आले आहे. या सर्व मुलींनी आता अधिक पोलिसांशी संपर्क साधून इतर मुलींची फसवणूक टाळणे गरजेचे आहे Byte जितेंद्र वाघ तपासाधिकारी मुंबई नाका पोलिस Vo 4 राज्यात मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून सुरू असलेला हा प्रकार थांबविण्यासाठी आता साईट चालकांनी व्हेरिफिकेशन स्वतःहून करणे गरजेचे आहे. तसेच मुलामुलींनी सतर्क राहून कुठेलही व्यवहार टाळणे आवश्यक आहे अन्यथा गोडीगुलाबीत एखादा हर्षवर्धन तुमची फसवणूक करू शकतो.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement