Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडमध्ये गॅस स्फोट: जीवितहानी टळली, पण धक्कादायक कारणे!

Mahendrakumar Mudholkar
Jun 27, 2025 10:31:10
Beed, Maharashtra
बीड : पेट्रोल पंपा समोरील साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅसचा भीषण स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही... Anc : शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील एका साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. दुपारी किचन रूम मध्ये असलेल्या घरगुती गॅसच्या तीन टाक्याला अचानक आग लागली. आगीत एका टाकीचा भीषण स्फोट झाला. यावेळी हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. जिथे गॅसच्या टाकीचा स्फोट झाला त्याच परिसरात केवळ 100 फुटाच्या अंतरावर पेट्रोल पंप होते. त्यामुळे मोठी हाणी टळली आहे. स्फोटात घरगुती गॅस आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड शहरातील अनेक हॉटेल मध्ये घरगुती गॅस सर्रासपणे वापरण्यात येतात. या स्फोटानंतर हॉटेल व्यावसायिकांकडून अनाधिकृत रित्या गॅस वापराचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement