Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

रायगडच्या बेने इस्रायली समाजाची अद्भुत कहाणी: संस्कृतीचा संगम!

PRAFULLA PAWAR
Jun 27, 2025 10:37:45
Raigad, Maharashtra
स्लग - रायगड जिल्ह्यातील बेने इस्रायली समाज ...... अँकर - बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील लोक समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग नवगावच्या किनाऱ्यावर आली. स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही. बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात. मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात. हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत. बाईट - ए. बी. आवासकर , पुरुष बाईट - मार्गारेट तळकर, तरुणी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement