Back
सोलापूरमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत!
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत (WKT)
अँकर : संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. शेगावहुन निघालेली गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, आमदार सचिन कल्याणशेट्टी या सर्वानी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. उळे येथील ग्रामस्थांनी देखील महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. पालखी मार्गांवर गुलाबाच्या पायघड्या टाकून यावेळी स्वागत करण्यात आले.
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
wkt : अभिषेक आदेप्पा, प्रतिनिधी
बाईट : आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
कल्याण आधारवाडी जेल रोड परिसरात झाड कोसळले
सायंकाळी साडेआठच्या सुमारास कल्याण आधारवाडी चौकात झाड कोसळल्याची घटना
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे ही दुर्घटना
सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत ऊन-सावलीचा लपंडाव, अधूनमधून जोरदार सरी
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात तीन झाडं कोसळली
झाड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही ठिकाणी ट्राफिक जाम
तर वादळी वाऱ्यामुले कल्याण शहर मधील काही ठिकाणी बत्तीगुल
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या छतावर वस्तू
काम करत असताना राहून गेली वस्तू
एका जागरूक नागरिकांनी केलं मोबाईल मध्ये चित्रीकरण
सदर वस्तू खाली घसरून पडल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता
bdl railway
Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या अनेक विकास काम सुरू आहेत, यात रेल्वे स्थानकावर मोठी पत्र्याची शेड टाकण्यात आली आहे ,मात्र या शेडच काम सुरू असताना एक वस्तू या पत्र्याच्या शेडवर राहून गेली आहे, रेल्वे स्थानकासमोरील इमारतीत राहणाऱ्या एका जागृत नागरिकांनी या वस्तूचं चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केल आहे, ही लोखंडी वस्तू आहे की लाकडी हे मात्र समजू शकले नाही , मात्र ही वस्तू जर घसरून खाली कोणाच्या पडली तर तर मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच ही वस्तू काढून टाकण्याची गरज आहे
चंद्रशेखर भुयार बदलापूर
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण मधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी आणि प्रांतांचा वाद चव्हाट्यावर
मराठी मुलांना कामावरून काढा आम्ही पगार देऊ.. मेट्रोचे काम करणारे ठेकेदारांचे MD याचा फोन वरून धमकी
शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवर एमडी चा संभाषण केलं रेकॉर्ड करत आहे त्या पोलीस ठाण्याला तक्रार देण्याच्या तयारीत
Anc कल्याण ते तळोजा पर्यंत एम एम आर डी ए चे मेट्रो प्रकल्प सुरू असून या कामा दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत आणि हे सुरक्षा रक्षक हरियाणा मधील गवार कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असून यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील मुलं देखील काम करतात मात्र गेले दोन महिन्यापासून या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्याने अखेर याचा जाब विचारण्यासाठी शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणचा सुपरवायझर यांना पगार विषयी विचारणा केली असता त्यांनी हरियाणा मधील त्यांचे एमडी आहेत यांच्याशी बोला असे सांगत फोन लावून त्यांच्याशी संपर्क साधला या वेळेला त्यांच्या Md ने चक्क मराठी मराठी मुलांना कामावरून काढून टाका नंतर पगार देईल असे सांगितले यावेळी हरीश इंगळे ने त्यांचं हे संभाषण आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले असून या संबंधात संबंधित पोलिसांच्या गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली सध्या कल्याणमध्ये तणावाचे वातावरण असून एकीकडे मराठीची अस्मिता त्याचबरोबर हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याने महाराष्ट्रात मराठी हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्यातच अशाप्रकारे कामगारांचा पगार न देता त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने आता महाराष्ट्राच्या प्रकल्पामध्ये मराठी मुलांना कामावर ठेवावी अशी मागणी केली जात आहे
Byte.. हरेश इंगळे
शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस
byte... आयुप शेख
सुरक्षा रक्षक
0
Share
Report
Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Hindu Agit
File: 02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: प्राण सोडला पण धर्म नाही सोडला या घोषणांनी
शिरूर शहरातुन शक्ती प्रज्ञा’च्या हक्कासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं.
Vo :- सांगलीतील श्रद्धा राजे यांच्यावर कथित धर्मांतरणाचा दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातुन आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर मार्केट यार्ड ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने हिंन्दु बांधवांसह महिलांनी सहभाग घेत धर्मांतरविरोधी कडक कायदा लागू करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली हे आंदोलन शांततापूर्ण आणि ठाम इशाऱ्याच्या स्वरूपात पार पडलं
Byte: महेश लांडगे (आमदार भोसरी विधानसभा)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
28062025
Slug - PPR_SANJAY_RATHOD
feed on 2c
file 03
---------
Anchor - मराठीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी होईल. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेना सूचक इशारा.
महाराष्ट्रात हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी सांगितले आहे. आता अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक गोष्टी बाहेर येतील असा दावा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होईल असा इशाराच जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे
-------
Byte - संजय राठोड, जलसंधारण मंत्री
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गट व मनसे पुन्हा एकत्र;
उद्या कल्याण मध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन
शिवसेना ठाकरे गटाचे बाळा परब आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात उद्याच्या आंदोलनाच्या तयारीसाठी कल्याण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठकीचे आयोजन
बैठकीस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
याआधी डोंबिवलीत पलावा पुलप्रश्नीही ठाकरे व मनसे दोघे पक्ष आले होते एकत्र
मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेल्या ठाकरे-मनसे कार्यकर्त्यांच्या उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लागले लक्ष.
121..सेना उद्धव ठाकरे.. मनसे
उपनेते...विजय साळवी ubt
माजी आमदार.. प्रकाश भोईर मनसे
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- मंत्री उदय सामंत byte पॉईंटर
On जागा वाटप -- आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी 60 टक्के जागांची मागणी केल्यानंतर मी त्यांना असं म्हणालो कि संघटना एवढी मजबूत करा कि आपण 80 टक्के जागा मागू महायुतिच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ठरवतील इथल्या जागा वाटपाबाबत नारायण राणे निर्णय घेतील
on 100 टक्के शिवसेना -- भाजपाला आम्ही दोष देत नाही. संघटना वाढीबाबत जी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची आहे. महायुती म्हणून निवडणुका लढविण्याचे अधोरेखित झालंय. मात्र आपला पक्ष दखल घेण्याऐवढा असावा अशी आमची भूमिका आहे
on दावा --- महायुतीचा मेळावा म्हणून आम्ही 70 टक्के आहोत आमचे आमदार जास्त आहेत असं आम्ही बोललो मात्र निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार. महायुतीची सत्ता जिल्हापरिषद वर येईल
on मोर्चा ( उद्याच्या विजयाची नांदी संजय राऊत वक्तव्य ) -- संजय राऊत यांनी असं अनेक वेळा भविष्य सांगितलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी ठरविलेल्या त्यांची भाकीत खरं झाली नाहीत. हे सुद्धा होणार नाही.
काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची बांधनी होत असं नाही
on स्थानिक स्वराज्य निवडणुका परिणाम --- आम्ही युती करत आहोत असं कुठलेही ठाकरे बोलले नाहीत.
On मोर्चा -- हिंदीची सक्ती करावी हा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता. उबाठा च्या लोकांनी उत्तर द्यावे कि आतां हिंदी नको तर तेव्हा अहवाल का स्वीकारला उबाठाची ही दुटप्पी भूमिका आहे.
On आदित्य ठाकरे -- तीन वर्षपूर्वीच्या सत्ता गेल्याच्या तणावातुन हे लोक बाहेर आलेले नाहीत. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनला आहे. मुलांचं नुकसान होणार नाही आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यक नाही. 35 टक्के सुद्धा मार्क न पडलेल्यांनी स्वतःची दखल घ्यावी
on मोर्चा --- मुख्यमंत्री असताना ज्यांनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आज मोर्चात सहभाग घेत असतील तर हे जगातील आठव आश्चर्य आहे.
On विनय नातू --- त्यांच्या वर आमचे जिल्हाप्रमुख बोलतील त्यांच्यावर मी बोललो तर ते राष्ट्रीय नेते होतील.
On कौशल्य विकास ( पगार ) --- कौशल्य विकास मंत्र्यांसोबत चर्चा झालीय. येत्या 15 दिवसात निर्णय होईल
byte --- मंत्री उदय सामंत
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
slug _ विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू .
पालघर _
विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय .बोईसर च्या सिद्धार्थ नगर परिसरातील घटना आहे . चार वर्षीय रविकांत यादव या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. घरात खेळत असताना शॉक लागुण मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराजांच्या दिंडी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामाची उळेगावात करण्यात आली विशेष व्यवस्था ( WKT )
- वारकरी सांप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल
- दक्षिण सोलापुर तालुक्यातील उळे गावात वारकरी, टाळकरी, सेवेकरांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था
- श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी वॉटरप्रूफ तंबूची व्यवस्था
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....( WKT )
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत भाजपमधील राजीनाम्यानंतर बॅनरबाजीचा धडाका,
दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी....मात्रे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन!
Anc.. डोंबिवलीत भाजप पक्षातून राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन केलं आहे. डोंबिवली पश्चिमेतील विविध चौकांमध्ये पाठिंबा दर्शवणारे बॅनर लावण्यात!@ आले असून, “दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” असा ठळक मजकूर या बॅनरवर दिसत असून बॅनर बाजी करत समर्थकांनी भावनिक आणि ठाम संदेश देत पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मूठ बांधलेला हाताचे चिन्ह देऊन एकतेचं आणि संघटीत ताकदीचं प्रदर्शन करण्यात आलं आहे.
0
Share
Report