Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

गोपीचंद पडळकरांचा ठाकरे शिवसेनेवर हल्ला: 8 अमराठी खासदारांचा रहस्य?

Sarfaraj Musa
Jul 06, 2025 01:31:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शिवसेनेने 8 अमराठी खासदार कोणत्या प्रेमातून केले ? मराठी आम्ही आमच्या आईच्या पोटातून शिकतो - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर. अँकर - मराठी आम्ही आमच्या आईच्या पोटात शिकतो,ती कोणी शिकवायची गरज नाही,अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.तसेच मराठीचा गळा काढणारया ठाकरे शिवसेनेने आज पर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार केलेत, ते त्यांनी कोणत्या प्रेमातुन केले ? हे जनतेला सांगावे,असं आवाहन देखील ठाकरे शिवसेनाला करत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अमराठी खासदारांची यादीच वाचून दाखवली,तसेच छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या,मग आमच्या मुलांना तीन भाषा तर आल्या पाहिजेत का नको ? असा सवाल देखील आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे,ते सांगलीच्या विटा येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. साउंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार ,भाजपा.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement