Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

काँग्रेसचे कुणाल पाटील भाजपकडे? कार्यकर्त्यांची मागणी बदलाची!

PRASHANT PARDESHI
Jun 28, 2025 14:30:53
Dhule, Maharashtra
Anchor - उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आता जवळपास निश्चित झालेला आहे. धुळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. बदल हवा आहे अशी कार्यकर्त्यांची मागणी असून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर मी लवकरच माझा निर्णय घेणार असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकतीच भाजपाचे नेते व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुणाल पाटील हे भाजपा प्रवेश करत असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या. दरम्यान मंत्री राहुल यांच्या भेटीनंतर कुणाल पाटील यांनी धुळ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांना विकासाच्या दृष्टिकोनातून बदल हवा असल्या तर सांगत त्यांच्या भाजपच्या बाबत पाठिंबा दर्शविला. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून त्यांच्या भावनात जाणून घेतल्यानंतर निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेतला असल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी दिली. भाजप प्रवेशाबाबत कुणाल पाटील यांनी स्पष्टपणे होकार दिला नसला तरी या मेळाव्यानंतर ते भाजपा जाणार असल्याचा आता स्पष्ट मानले जात आहे. byte - कुणाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement