Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर शाळेची तोडफोड, ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण!

Mahendrakumar Mudholkar
Jun 27, 2025 05:32:02
Beed, Maharashtra
बीड : संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये जिल्हा परिषद शाळेची तोडफोड, ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण Anc : सबंध राज्यात चर्चेत असलेल्या मस्साजोग गावातून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या दरवाजांची आणि खिडक्यांच्या काचांची तोडफोड करण्यात आली असून, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिक्षण मंदिरावरच झालेला हा हल्ला केवळ मालमत्तेवर नव्हे, तर समाजाच्या भविष्यावरच आघात मानला जातोय. गावात पुन्हा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार? आणि या दहशतीला आळा कधी बसेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement