Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये मुसळधार पावसाने हॉटेलला दिला मोठा धक्का!

GANESH MOHALE
Jun 27, 2025 10:04:39
Washim, Maharashtra
वाशिम : File:2706ZT_WSM_HOTEL_DAMAGE_WKT WSM_HOTEL_DAMAGE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद व कुकसा परिसरातील उतावळी नदी दुथडी भरून वाहत होती.नदीला पूर आल्याने पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील कुकसा फाट्याजवळील हमीद शाहा यांचे हॉटेल पाण्याखाली गेले.पूराचे पाणी हॉटेलमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.विशेष म्हणजे, हॉटेलमधील मलंग शाहा हे सात ते आठ तास पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र शिरपूर पोलीस व स्थानिक नागरिकांनी धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.हमीद शाहा यांच्या हॉटेलवरच त्यांचा संपूर्ण परिवार अवलंबून होता.आता उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांनी अश्रूंच्या धारा लपवू शकल्या नाहीत. त्यांच्या नुसकानीबाबत हॉटेल चालक शाहा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी ..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement