Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

लिमला गावात महिलांचा दारू विरोधी आंदोलन, शेकडो लोकांची उपस्थिती!

GAJANAN DESHMUKH
Jun 30, 2025 09:33:13
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या लिमला गावातील महिला दारू आणि ढाबे संस्कृतीच्या विरोधात आक्रमक झाल्या असून आज महिला सरपंच प्रज्ञा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत लिमला गाव आणि परिसरातील दारू बंद करण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. यावर ग्रामपंचायतीच्या या बैठकीला गावातील शेकडो महिला आणि पुरुष ही उपस्थित होते, दारूमुळे अनेकांची संसार देशोधडीला लागली आहेत. नव तरुण ही व्यसनाधीन होत चालले असून यामुळे गावाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक नुकसान होत असल्याचे मत गावकर्यांनी उपस्थिती केला. तर महिलांनी मद्यपी पती मुलांकडून कुटुंबियांची कसा मानसिक शारीरिक छळ होत आहे,याची आपबीती सांगितली,येत्या 7 जुलै रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून यामध्ये परवाना धारक दारु विक्रेते आणि ढाबा बंदीचा ठराव घेतला जाणार असल्याचे गावकर्यांनी सांगितले... बाईट- १,२- महिला
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement