Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

बदलापुरात रिक्षाचालकांना शिस्त मोडल्यास कडक कारवाईचा इशारा!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 30, 2025 14:04:23
Ambernath, Maharashtra
'रिक्षाचालकांनी शिस्त मोडल्यास कडक कारवाई करणार' पोलीस उपायुक्तांचा बदलापुरातील बेशिस्त रिक्षाचालकांना इशारा रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करण्याचा आवाहन Bdl auto action Anchor - बदलापुरातील रिक्षा चालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलाय. रांगेत प्रवासी घेणं, रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं, युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आवाहनही त्यांनी रिक्षा चालकांना केलय.             बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे  इतर अधिकारी तसच रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षाचालकांना सूचना देण्यात आल्या. ओव्हर टेकिंग करणं, ओव्हर सीट घेणं तसंच स्टॅन्ड सोडून इतरत्र रिक्षा उभी करणं असे प्रकार रिक्षा चालकांकडून सर्रास वाढले आहेत. मात्र यापुढे रिक्षाचालकांनी शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपयुक्तांनी या बैठकीत दिला. तसंच बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरच काही नवीन रिक्षा स्टॅन्डही सुरू केले जातील अशी माहितीही त्यांनी दिलीय. Byte - पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement