Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणार का?

VISHAL KAROLE
Jul 03, 2025 03:03:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn airport av Feed attached छत्रपती संभाजीनगर च्या चिकलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. आता या पाहणीच्या अहवालाची विमानतळ प्राधिकरणाला प्रतीक्षा असून, अहवालानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची दिशा ठरणार आहे. गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टलाही  मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.  ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, या संदर्भात ब्यूरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाला अहवाल दिला जाईल. अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, परंतु काही बदल करावे लागतील, अशी चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement