Back
जालना: सरकारने समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली, जरांगे नाराज!
NMNITESH MAHAJAN
FollowJul 03, 2025 08:35:01
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_JARANGE(1 FILE)
जालना | ब्रेकिंग
न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची
मुदतवाढ
समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार : जरांगे
मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतली, सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही,निर्णयाचं स्वागत पण एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे : जरांगे
समितीनं रेकॉर्डही तपासले पाहिजे,कुणबी प्रमाणपत्र वाटपही झाले पाहिजे
सगे-सोयरेची अंमलबजावणी करा
मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा
हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करा,सातारा, बॉम्बे गॅझेटही लागू करा
अँकर | कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारनं 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिलीय.30 जून रोजी या समितीची मुदतवाढ संपुष्टात आली होती. अखेर राज्य सरकारनं 2 जुलै रोजी नवा अध्यादेश काढत 31 डिसेंबरपर्यत न्या.शिंदे समितीला मुदतवाढ दिलीय.दरम्यान राज्य सरकारने या समितीच्या मुदतवाढीबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
न्या.संदीप शिंदे समितीला मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतलीय. सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही या निर्णयाचं स्वागत पण शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलंय.समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करण्याबरोबरच आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार असा ईशारा जरांगे यांनी दिलाय.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJul 20, 2025 02:32:04kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे.
( मराठी और हिंदी दोनो मे )
-----
*प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवण्यात आल्या 3 लाख राख्या*
राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने तीन लाख राख्या पाठविण्यात आल्यात. नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने 3 लाख राख्या पाठविल्या. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कर्नल लवलीना यांना सुपूर्द करण्यात आल्या. . मोठ्या प्रमाणात यावेळेला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या 31 वर्षांपासून प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे हा उपक्रम राबवल्या जात आहे
Byte
कर्नल लवलीना, सैन्य अधिकारी
बाईट
फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, सचिव प्रहार समाज जागृती
≠==========================================================================
*बॉर्डर पर तैनात सैनिकों के लिए भेजी गई 3 लाख राखियां ,आर्मी पोस्टल सर्विस की अधिकारी को सौंप गई राखियां,
बॉर्डर पर तैनात फौजियों के लिए नागपुर से 3 लाख राखियां प्रहर समाज जागृति संस्था के संलग्न विद्यार्थियों ने भेजी है ,पिछले 31 वर्षों से प्रहार समाज जागृति संस्था देश की निस्वार्थ रक्षा करने वाले भारत के बहादुर सैनिकों के लिए राखी भेजती आ रही है ,पिछले वर्ष इन विद्यार्थियों ने ढाई लाख राखी भेजी थी, जिसमें इस वर्ष 50000 का इजाफा करते हुए, इस वर्ष सैनिकों के लिए 3 लाख राखियां भेजी गई ,नागपुर में आयोजित कार्यक्रम में आर्मी पोस्टल सर्विस की कर्नल लवलीना कौ 3 लाख राखीयाँ सौपी गई,
प्रहर समाज जागृति संस्था की छात्राओं ने मुख्य अतिथि कर्नल लवलीना सहित आर्मी पोस्टल सर्विस के जवानों को राखी बाधी , इस आयोजन में नागपुर के 30 से अधिक शिक्षण संस्थाओं ने उनकी संस्थाओं द्वारा बनाई गई राखीयाँ भी फौजियों के लिए सौपा, यह राखियां दूर दराज क्षेत्रों में जहां पर सैनिक विषम परिस्थितियों में अपनी कर्तव्य का पालन कर रहा है, वहां पर यह राखियां भेजी जाएगी ,उसको यह राखियां अहसास दिलाएंगी कि वह अकेला नहीं है, पूरा देश उसके पीछे है ,पूरा देश उसका परिवार है,
इस दौरान कर लवलीना ने कहा कि इस संस्था द्वारा गत वर्ष की तुलना में 50000 अधिक रखीयाँ भेजी जा रही है, यह राखियाँ सैनिकों को देश की रक्षा करने के लिए प्रेरित करती है, यह राखी हमारे देश की रक्षा करने का दायित्व प्रदान करती है, उन्होंने आगे कहा की राखियां फौजियों तक पहुंचाने का दायित्व उन्हें दिया गया है, वह अच्छे तरीके से फौजियों तक यह राखियां, राखी से पहले पहुंचा देंगे ,
प्रहर समाज जागृति संस्था की सचिव रिटायर फ्लाइट लेफ्टिनेंट शिवाली देशपांडे ने बताया कि 3 लाख राखियों के साथ-साथ प्रहार के विद्यार्थियों ने देश के जवानों के लिए कुछ संदेश, कई बार सैनिकों को छुट्टी नहीं मिलती, रक्षाबंधन पर जाकर रक्षाबंधन पर अपने परिवार के साथ राखी बंधवाए ,इसलिए यह राखियां हमारे संस्था के बच्चे भेजते हैं, संस्थान या लक्ष्य रखा है कि अगले वर्ष के तीन लाख की संख्या को बढ़ाकर 4 लाख राखियां भेजी जाएगी,
1
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 02:31:56Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_HOSPITAL_CHECK
FILE - 3 VIDEO
आरोग्य विभागाकडून श्याम हॉस्पिटलची चौकशी सुरू
Anchor :- साकोली येथील श्याम हॉस्पिटल येथे ९ जुलैला एका १७ वर्षीय
अल्पवयीन मुलीसोबत डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. याची पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर तेव्हापासून फरार आहे. याबाबत, शनिवार, १९ जुलैला आरोग्य विभाग भंडारा चमु संध्याकाळी श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक करण्यासाठी आली होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमुने
येथे कागदोपत्री कारवाई केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
1
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 20, 2025 02:31:51Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_RECORD
हरित धाराशिव, धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी लावली 15 लाख झाडे, एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.
नोंद होणारा धाराशिव ठरला पहिला जिल्हा
अँकर
धाराशिव_हरित धाराशीव उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या उच्चांकी वृक्ष लागवडीची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वृक्ष लागवडीत या दोन्ही संस्थेत नोंद होणारा धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. 234 ग्रामपंचायत नगरपरिषदा व नगरपालिकेच्या 5 हजार हेक्टर क्षेत्रात ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. सिने अभिनेता स्वप्निल जोशी व परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाई यांच्या उपस्थितीत ही वृक्ष लागवड करण्यात आली .जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून मोठी तयारी करून ही वृक्ष लागवड यशस्वी केली. धाराशिवीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या या झाडांची जपणूक व संवर्धन करण्याचं मोठं आवाहन प्रशासन व नागरिकांसमोर असणार आहे.
Byte प्रताप सरनाईक पालकमंत्री
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 02:30:38Raigad, Maharashtra:
स्लग - गिरीचे मस्तकी गंगा, धबाबा तोय आदळे
रायगड किल्ल्यावरून कोसळताहेत जलधारा
अँकर - समर्थ रामदास स्वामींनी शिवथर घळ येथील धबधब्याचे वर्णन करताना गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे असं वर्णन केल आहे. या श्लोकाची आठवण रायगड किल्ल्यावरून कोसळणारे धबधबे पाहिले की होते आहे. गेली दोन दिवस रायगडमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे आणि किल्ले रायगडच्या चहू बाजूने पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ढग आणि धुक्याच्या पडद्याआड लपंडाव खेळणारा रायगड आणि गडावरून कोसळणारे धबधबे यामुळे रायगडाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 02:30:28Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_KNIFE_ATTACK
FILE - 5 VIDEO
महिलेवर केला चाकूने हल्ला......भंडाऱ्याच्या टाकळी येथील घटना..... महिला गंभीर....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी असलेली संगीता संजू बावणे हिच्यावर चाकू हल्ला झाला असून गंभीर जखमी आहे. संगीता ही धुनी भांडीचे काम करीत आहे. तिचे आरोपी रवींद्र देवगडे याच्याशी संबंध होते मात्र रवींद्रची प्रकृती बरी नसताना ती त्याच्याशी दुरावली होती, माझ्याशी का बोलत नाही म्हणून यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान रवींद्र ने सदर महिलेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 20, 2025 01:30:11Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीचा जेलमधून सुटताच उन्माद!
पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत वाजवले ढोलताशे!
पोलिसांची गुन्हेगारांवर वचक आहे का ?
Ulh accused
Anchor : उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीने जेलमधून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोलताशे वाजवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा सोनमणी झा आणि बिट्टू सिताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले. तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता, तिच्याच घरासमोरच फटाके फोडत ढोल ताशे वाजवत विकृत सेलिब्रेशन करण्यात आलं. एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल, तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात काय? उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 16:30:39Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_BANER
उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले
उमरग्यामध्ये पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनर वर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती
शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी उमरगा शहरात लावले होते बॅनर
उमरगा शहरात विविध ठिकाणी लावलेले आठ ते दहा बॅनर फाडल्याचे समोर
आकांक्षा चौगुले कडे शिवसेनेचे
मराठवाडा युवती सेना पक्ष निरीक्षक तर किरण गायकवाड यांच्याकडे
मराठवाडा युवा सेना पक्षनिरीक्षक पद
पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते, बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी सरनाईक उमरग्यात
बॅनर कोण? फाडले याचा उमरगा पोलीस कडून शोध सुरू
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 19, 2025 16:04:16Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मंत्री संजय शिरसाट शिंगणापूर येथे शनी चरणी...
फीड 2C
Anc:- अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ शनिचरणी लिंक झाले आहेत मागच्या काही दिवसांपासून संजय शिरसाठ यांच्यावर आरोपांची मोठी मालिका सुरू झाली आहे हॉटेल खरेदी प्रकरण थोडे माग पडत नाही तोच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली होती अधिवेशन काळामध्ये शिरसाठ यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांचा मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला त्यामुळे अधिवेशन संपताच शिरसाठ यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटाची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे आपल्याकडून काही चुका होतात किंवा घडतात अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाठ यांनी म्हटल आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाट ऑन एकनाथ शिंदे
Anc-
अधिवेशन काळातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेक आरोप झाले त्यातच त्यांचा घरामध्ये पैशाची बॅग असलेला एक व्हिडिओ समोर आला त्यामुळे शिरसाठ यांच्यासह शिवसेना शिंदे गटावरच विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाठ यांना खाजगी सुनावल्याची चर्चा आहे याबाबत शिरसाट यांना विचारलं असता असे कुठलेही चर्चा आपल्या सोबत झालेली नाही आपल्याला समाजात जाऊन काम करण्याचा सल्ला शिंदे साहेबांनी दिला असल्याचं म्हटलं आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाठ ऑन विजय वडट्टीवार
Anc:-
अधिवेशनाच्या शेवटी शेवटी प्रकरण बाहेर आलं यावरून विरोधकांनी मोठे रान उठवलं त्यातच काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी हे प्रकरण जुनाच असून या प्रकरणाची माहिती सत्ताधाऱ्यांना देखील असल्याचा खळबळ जनक खुलासा केला आणि या प्रकरणामुळेच शिंदेंचे सरकार स्थापन झाला असल्याचं म्हटलं आहे यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी वडट्टीवार यांना कधीही कुठलेही शोध लागतात असं सांगत या लोकांना सत्ता गेली त्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला आहे त्यांची आम्ही फार चिंता करत नसल्यास म्हटलं आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
14
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 19, 2025 16:03:47Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1907ZT_INDAPURBHARNEFUT
FILE 2
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचा हटके अंदाज.... अधिवेशनातून वेळ मिळताच तीन वर्षाच्या नातवा सोबत खेळणे फुटबॉल..... मंत्री भरणे आणि नातू आरुज याचा फुटबॉल खेळताना चा व्हिडिओ झाला व्हायरल....
Anchor_ राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात, आता मंत्री भरणे यांचा आपल्या तीन वर्षाचा नातू आरुज सोबत फुटबॉल खेळताना चा एक व्हिडिओ समोर आलाय. सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनातून वेळ मिळताच भरणे आपल्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले. याच वेळी आपला तीन वर्षाचा नातू आरुज याच्या सोबत मंत्री भरणे फुटबॉल खेळताना पाहायला मिळालेत.
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 19, 2025 16:03:39Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1907ZT_CHP_RSS_DRAMA
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार नाटकाचे सादरीकरण, भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने रा. स्व. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरील नाटकाचे मंचन, राष्ट्र विचाराने भारलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवन विचारातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
अँकर:-- नादब्रम्ह संस्थेद्वारे निर्मित युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार नाटकाचे चंद्रपुरच्या प्रियदर्शिनी सभागृहात सादरीकरण करण्यात आले. भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे मंचन करण्यात आले. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्या निमित्ताने देश- विदेशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे चंद्रपूर जन्मगाव आहे. यासोबतच यापूर्वीच्या 2 सरसंघचालकांचे शिक्षण याच शहरात झाले आहे. हा धागा पकडून राष्ट्र विचाराने भारलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवन विचारातून प्रेरणा घेण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
साउंड बाईट १) सुधीर मुनगंटीवार, आमदार, आयोजक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 19, 2025 15:31:58Ratnagiri, Maharashtra:
1907ZT_ RTN4 देंठ
रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारे येथील समुद्रात बुडून मृत्यू
आज संध्याकाळी अंदाजे 6.30 वाजताची घटना
दहा जणांचा ग्रुप फिरण्यासाठी म्हणून गेला होता आरेवारेच्या समुद्रकिनारी
समुद्रात पोहत असताना चौघांना लाटेने केले गिळंकृत
चारही जणांचा दुर्दैवी अंत, तीन महिला एक पुरुष
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 19, 2025 15:31:39Raigad, Maharashtra:
स्लग - महानगर गॅस कंपनीच्या पाईप लाइनला आग
पेण शहरातील घटना ..... आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ....
अँकर - रायगडच्या पेण शहरातील महानगर गॅस कंपनीच्या गॅस पाईप लाईनला आग लागली . नवीन पाईप लाइन टाकण्यासाठी कामात खोदकाम करत असताना ही लाइन अचानक फुटली आणि आगीचा भडका उडाला. यामुळे पेण शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
3
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 19, 2025 14:33:36Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Murder
Feed on - 2C
---------------------------
Anchor - नांदेड शहरात भरदिवसा एका 55 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून खूण करण्यात आला. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुदबईनगर परिसरात ही घटना घडली. शेख़ अज़ीम अस मयताच नाव आहे. शनिवारी सकाळी शेख आजम हे खुदबईनगर परिसरात एका ऑटो जवळ थांबले होते. यावेळी आरोपी सोबत त्यांचा वाद झाला. याच वादातुन आरोपीने शेख अजीम यांच्या पोटात चाकू भोसकले. रक्तबंबाळ झालेल्या शेख अजीम यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामीण पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. भरदिवसा झालेल्या ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
----------------
13
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 14:30:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1907_BHA_POLICE_SAND
FILE - 1 VIDEO
वाळू माफियांची मुजोरी वाढली.... वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालविला पोलिसांच्या अंगावर..... पोलिसांच्या पायाचा हाड मोडला....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे.. वाळूचे ट्रॅक्टर पकडायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच चालविले ट्रॅक्टर.... पोलिसांचा पायाचा हाड मोडला आहे... भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला मोठी मागणी आहे.. त्यासाठी वाळू माफिया वाट्टेल त्या मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक करीत आहेत. खमारी वाळू घाटावर वाळूची चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. म्हणून 15 पोलिस कर्मचारी खमारी येथे
पोहचले. नदी पात्रात 25 ते 30 ट्रॅक्टर अवैध रित्या वाळू उपसा करीत होते. पोलिस आल्याचे दिसताच ट्रॅक्टर चालकांनी पळ काढल. त्यात एका ट्रॅक्टरने तर पोलिसांच्या अंगावर गाडी चालविली. त्यात पोलिस त्र्यंबक गायधने यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्याच्या पायाच हाड मोडल. सद्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर उर्वरित पोलिसांनी 8 ट्रॅक्टर जप्ती केले आहे. त्यामुळे आता वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे...
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 19, 2025 14:02:08Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1907ZT_CHP_TREES_CUT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची मुजोरी पुन्हा एकदा कायम ,शहरातील एकमेव शिल्लक रामबाग मैदान नव्या जिल्हा परिषद इमारतीसाठी बांधण्यास नागरिकांचा होता विरोध, यासाठी जोरदार आंदोलन झाल्यानंतर काम थंडावले ,मात्र आता पुन्हा याच जागेवर 100 झाडे तोडून मैदानाचा एक भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न ,सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा लढा उभारण्याचा केला निर्धार
अँकर:-- नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चालवलेली मुजोरी पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे. शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामबाग मैदानाचा नव्या जिल्हा परिषद इमारतीसाठी वापर करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. यासाठी जोरदार जनआंदोलन झाले होते. या आंदोलनात चंद्रपूरकरांनी निकराचा लढा दिल्यानंतर प्रशासनाने तात्पुरती कारवाई थांबवली. मात्र आता पुन्हा मैदानाच्या एका वेगळ्या भागात 100 झाडे कापून मैदान गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अतिशय चतुराईने केल्या जाणाऱ्या या कामाविरोधात आता पुन्हा एकदा सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी निकराचा लढा उभारण्याचे ठरविले असून आर्थिक लाभासाठी शहरातील एकमेव मैदान प्रशासन गिळू पाहत आहे असा गंभीर आरोप केला जात आहे.
बाईट १) पप्पू देशमुख, अध्यक्ष, जनविकास सेना
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report