Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

कोळगाव आरोग्य उपकेंद्र बंद, नागरिकांचा संताप वाढत आहे!

GANESH MOHALE
Jul 03, 2025 09:38:24
Washim, Maharashtra
वाशिम: File:0307ZT_WSM_HEALTH_CENTER_CLOSED रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम च्या  मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रावर गेल्या सात वर्षांपासून बंद स्थितीत असून,मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि आवश्यक आरोग्य सुविधा नसल्यामुळे हे केंद्र कार्यान्वित होऊ शकलेले नाही. परिणामी गावातील रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत असून,यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाकडे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.मात्र संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा नव्याने बांधण्यात आलेल्या इमरतिची दुरावस्था होतं असून आरोग्य सेवा मिळावी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना,तीच न मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गावात नव्याने इमारत बांधून तयार असतानाही ते आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात यावे,ही आमची मागणी असून,प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेऊन कोळगाव उपकेंद्र सुरु करावे,अशी जोरदार मागणी सध्या गावकऱ्यांकडून होत आहे. बाईट:विजय शेंडगे,स्थानिक नागरिक,कोळगाव 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement