Back
मनसेच्या मारहाणीनंतर मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली!
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 03, 2025 09:36:32
Mumbai, Maharashtra
Date-3july2025
Rep-prathamesh tawade
Loc-mira bhayander
Slug-MIRAROAD PROTEST
Feed send by 2c
Type -PKG
Slug- मिरा भाईंदर मध्ये अमराठी व्यापाऱ्याला मनसे मारहाण प्रकरण
आज मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यांची बंदची हाक
एकत्र येऊन निषेध केला व्यक्त.
अँकर - मिरारोड मध्ये मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यावरून चोप दिला होता , त्यानंतर आज मनसे विरोधात मीरा-भाईंदर मध्ये जैन , मारवाडी , गुजरात व्यापारी संघटनेने मिरा भाईंदर मध्ये बंदची हाक दिली आहे... शेकडो व्यापारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले..
मिरा रोड पूर्वेच्या हिरवी हॉलमध्ये या सर्व नागरिकांनी जमल्यानंतर हाताला काळया फीती बांधून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आंदोलण केले. ..मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी माहिती समोर येत आहे... अखेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत अशी समजूत काढून वातावरण शांत केले...
बाईट- प्रकाश गायकवाड, डीसीपी.
बाईtu-आंदोलनकर्ते , व्यापारी .
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 20, 2025 03:03:03Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Alefata Theft Open
File:03
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुश्क्या आवळण्यात आळेफाटा पोलिसांना आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद केलंय तर अद्यापही पाच आरोपी फरार आहेत अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सध्या आळेफाटा पोलीस करत आहेत
Byte: रविंद्र चौधर (उपविभागीय पोलिस अधिकारी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 20, 2025 03:02:57Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील वसमत रोडवर महावितरण च्या वतीने विद्युत वाहिणीस अडथळा ठरणाऱ्या अनेक झाडांची मध्यरात्री कत्तल कट्टल करण्यात आली. विद्युत वाहिणीस अडथळा ठरत नसलेली झाड ही तोडल्याचा वृक्षप्रेमी नागरिकांकडून आरोप होऊ लागला असून जेवढी झाडे तोडली किमान तेवढी झाडे तरी लावा अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांतून महावीतणकडे केली जात आहे...
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 20, 2025 03:01:27Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे, मंत्री जयकुमार गोरे यांचा राज ठाकरेंना टोला
*ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ऑन राज ठाकरे*
- राज ठाकरे यांनी कधीतरी काहीतरी सुरू करण्यासंदर्भात बोलावं
- बंद करणारी भाषा महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही
- महाराष्ट्र मराठी भूमी आहे, जेव्हा आपण विकसीत महाराष्ट्राची भाषा मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत पुढे घेऊन जावं लागतं, हे पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत
- निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे...
- या दिवशी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत आहे अशा घोषणा ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा निघून जाते
- चिमणीच घरट पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घरट कधीच पूर्ण होत नाही..
- तसेच निवडणूक आली की मराठीच प्रेम.. निवडणूक आल्यानंतर मुंबईच प्रेम.. हे जे आहे ते सत्तेपर्यंत कधीही पोहोचवणार नाही
बाईट -
जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
1
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 20, 2025 03:01:15Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार दुकाने खाक झाली. बसस्थानक परिसराच्या काही अंतरावर असलेले चार व्यावसायिकांचे टेलरिंग शॉपला आग लागली. त्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच पुसद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 03:00:41Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये गांजा तस्कर तरुणला बेड्या खडकपाडा पोलिसांची कारवाई, पाच लाखाचा मुद्देमाल ही जप्त
Anc... कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पाच लाख किमतीचा गांजा जप्त करत एका तरुणाला अटक केली आहे. रवी गवळी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
Vio:- १७ तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. योगीधाम-अमृतधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, साई दर्शन ढाब्यासमोर आणि वालधुनी नदीच्या काठावर सापळा रचून रवी शिवाजी गवळी याला ताब्यात घेण्यात आले. गवळी हा अनुपमनगर, जयदुर्गे चाळ, खडकपाडा येथील रहिवासी आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे रवी गवळीविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Byte :- कल्याणजी घेटे ( कल्याण एसीपी)
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 03:00:32Raigad, Maharashtra:
स्लग - माणगावमधील तरुणांनी केलं खवले मांजराचे संरक्षण ...... सुरक्षित पकडून दिलं वनविभागाच्या ताब्यात ...... पुराच्या पाण्यात वाहत आले मानवी वस्तीत ..... वन्यजीव संरक्षणात खवले मांजराला सर्वोच्च स्थान ......
अँकर - वन्यजीव संरक्षणात सर्वोच्च स्थान असलेले खवले मांजर रात्रीच्या सुमारास माणगाव शहरातील खांदाड परिसरात आढळून आले. स्थानिक तरुणांनी वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याशी संपर्क साधत या खवले मांजराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने त्याला सुखरूप दूर जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. मादी जातीचे हे खवले मांजर अतिशय सशक्त आणि पूर्ण वाढ झालेलं आहे. या परिसरात कुठंही खवले मांजराचा नैसर्गिक अधिवास दिसून येत नाही. पुराच्या पाण्यासोबत ते वाहून इथवर आले असावे असा वन्यजीव अभ्यासकांचा दावा आहे. खवले मांजराला निसर्गात अनन्य साधारण महत्व असून ते नैसर्गिक परिसंस्थांचा महत्वाचा भाग आहे. त्याची तस्करी रोखण्यासाठी कायदा करण्यात आला आहे.
बाईट - शंतनु कुवेसकर , वन्यजीव अभ्यासक
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 20, 2025 02:32:04kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे.
( मराठी और हिंदी दोनो मे )
-----
*प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवण्यात आल्या 3 लाख राख्या*
राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने तीन लाख राख्या पाठविण्यात आल्यात. नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने 3 लाख राख्या पाठविल्या. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कर्नल लवलीना यांना सुपूर्द करण्यात आल्या. . मोठ्या प्रमाणात यावेळेला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या 31 वर्षांपासून प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे हा उपक्रम राबवल्या जात आहे
Byte
कर्नल लवलीना, सैन्य अधिकारी
बाईट
फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, सचिव प्रहार समाज जागृती
≠==========================================================================
*बॉर्डर पर तैनात सैनिकों के लिए भेजी गई 3 लाख राखियां ,आर्मी पोस्टल सर्विस की अधिकारी को सौंप गई राखियां,
बॉर्डर पर तैनात फौजियों के लिए नागपुर से 3 लाख राखियां प्रहर समाज जागृति संस्था के संलग्न विद्यार्थियों ने भेजी है ,पिछले 31 वर्षों से प्रहार समाज जागृति संस्था देश की निस्वार्थ रक्षा करने वाले भारत के बहादुर सैनिकों के लिए राखी भेजती आ रही है ,पिछले वर्ष इन विद्यार्थियों ने ढाई लाख राखी भेजी थी, जिसमें इस वर्ष 50000 का इजाफा करते हुए, इस वर्ष सैनिकों के लिए 3 लाख राखियां भेजी गई ,नागपुर में आयोजित कार्यक्रम में आर्मी पोस्टल सर्विस की कर्नल लवलीना कौ 3 लाख राखीयाँ सौपी गई,
प्रहर समाज जागृति संस्था की छात्राओं ने मुख्य अतिथि कर्नल लवलीना सहित आर्मी पोस्टल सर्विस के जवानों को राखी बाधी , इस आयोजन में नागपुर के 30 से अधिक शिक्षण संस्थाओं ने उनकी संस्थाओं द्वारा बनाई गई राखीयाँ भी फौजियों के लिए सौपा, यह राखियां दूर दराज क्षेत्रों में जहां पर सैनिक विषम परिस्थितियों में अपनी कर्तव्य का पालन कर रहा है, वहां पर यह राखियां भेजी जाएगी ,उसको यह राखियां अहसास दिलाएंगी कि वह अकेला नहीं है, पूरा देश उसके पीछे है ,पूरा देश उसका परिवार है,
इस दौरान कर लवलीना ने कहा कि इस संस्था द्वारा गत वर्ष की तुलना में 50000 अधिक रखीयाँ भेजी जा रही है, यह राखियाँ सैनिकों को देश की रक्षा करने के लिए प्रेरित करती है, यह राखी हमारे देश की रक्षा करने का दायित्व प्रदान करती है, उन्होंने आगे कहा की राखियां फौजियों तक पहुंचाने का दायित्व उन्हें दिया गया है, वह अच्छे तरीके से फौजियों तक यह राखियां, राखी से पहले पहुंचा देंगे ,
प्रहर समाज जागृति संस्था की सचिव रिटायर फ्लाइट लेफ्टिनेंट शिवाली देशपांडे ने बताया कि 3 लाख राखियों के साथ-साथ प्रहार के विद्यार्थियों ने देश के जवानों के लिए कुछ संदेश, कई बार सैनिकों को छुट्टी नहीं मिलती, रक्षाबंधन पर जाकर रक्षाबंधन पर अपने परिवार के साथ राखी बंधवाए ,इसलिए यह राखियां हमारे संस्था के बच्चे भेजते हैं, संस्थान या लक्ष्य रखा है कि अगले वर्ष के तीन लाख की संख्या को बढ़ाकर 4 लाख राखियां भेजी जाएगी,
1
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 02:31:56Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_HOSPITAL_CHECK
FILE - 3 VIDEO
आरोग्य विभागाकडून श्याम हॉस्पिटलची चौकशी सुरू
Anchor :- साकोली येथील श्याम हॉस्पिटल येथे ९ जुलैला एका १७ वर्षीय
अल्पवयीन मुलीसोबत डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. याची पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर तेव्हापासून फरार आहे. याबाबत, शनिवार, १९ जुलैला आरोग्य विभाग भंडारा चमु संध्याकाळी श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक करण्यासाठी आली होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमुने
येथे कागदोपत्री कारवाई केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
3
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 20, 2025 02:31:51Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_RECORD
हरित धाराशिव, धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी लावली 15 लाख झाडे, एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.
नोंद होणारा धाराशिव ठरला पहिला जिल्हा
अँकर
धाराशिव_हरित धाराशीव उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या उच्चांकी वृक्ष लागवडीची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वृक्ष लागवडीत या दोन्ही संस्थेत नोंद होणारा धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. 234 ग्रामपंचायत नगरपरिषदा व नगरपालिकेच्या 5 हजार हेक्टर क्षेत्रात ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. सिने अभिनेता स्वप्निल जोशी व परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाई यांच्या उपस्थितीत ही वृक्ष लागवड करण्यात आली .जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून मोठी तयारी करून ही वृक्ष लागवड यशस्वी केली. धाराशिवीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या या झाडांची जपणूक व संवर्धन करण्याचं मोठं आवाहन प्रशासन व नागरिकांसमोर असणार आहे.
Byte प्रताप सरनाईक पालकमंत्री
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 02:30:38Raigad, Maharashtra:
स्लग - गिरीचे मस्तकी गंगा, धबाबा तोय आदळे
रायगड किल्ल्यावरून कोसळताहेत जलधारा
अँकर - समर्थ रामदास स्वामींनी शिवथर घळ येथील धबधब्याचे वर्णन करताना गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे असं वर्णन केल आहे. या श्लोकाची आठवण रायगड किल्ल्यावरून कोसळणारे धबधबे पाहिले की होते आहे. गेली दोन दिवस रायगडमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे आणि किल्ले रायगडच्या चहू बाजूने पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ढग आणि धुक्याच्या पडद्याआड लपंडाव खेळणारा रायगड आणि गडावरून कोसळणारे धबधबे यामुळे रायगडाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 20, 2025 02:30:28Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2007_BHA_KNIFE_ATTACK
FILE - 5 VIDEO
महिलेवर केला चाकूने हल्ला......भंडाऱ्याच्या टाकळी येथील घटना..... महिला गंभीर....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी असलेली संगीता संजू बावणे हिच्यावर चाकू हल्ला झाला असून गंभीर जखमी आहे. संगीता ही धुनी भांडीचे काम करीत आहे. तिचे आरोपी रवींद्र देवगडे याच्याशी संबंध होते मात्र रवींद्रची प्रकृती बरी नसताना ती त्याच्याशी दुरावली होती, माझ्याशी का बोलत नाही म्हणून यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान रवींद्र ने सदर महिलेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 20, 2025 01:30:11Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीचा जेलमधून सुटताच उन्माद!
पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत वाजवले ढोलताशे!
पोलिसांची गुन्हेगारांवर वचक आहे का ?
Ulh accused
Anchor : उल्हासनगरात विनयभंगाच्या आरोपीने जेलमधून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोलताशे वाजवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा सोनमणी झा आणि बिट्टू सिताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले. तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता, तिच्याच घरासमोरच फटाके फोडत ढोल ताशे वाजवत विकृत सेलिब्रेशन करण्यात आलं. एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल, तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात काय? उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 16:30:39Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_BANER
उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले
उमरग्यामध्ये पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनर वर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती
शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी उमरगा शहरात लावले होते बॅनर
उमरगा शहरात विविध ठिकाणी लावलेले आठ ते दहा बॅनर फाडल्याचे समोर
आकांक्षा चौगुले कडे शिवसेनेचे
मराठवाडा युवती सेना पक्ष निरीक्षक तर किरण गायकवाड यांच्याकडे
मराठवाडा युवा सेना पक्षनिरीक्षक पद
पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते, बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी सरनाईक उमरग्यात
बॅनर कोण? फाडले याचा उमरगा पोलीस कडून शोध सुरू
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 19, 2025 16:04:16Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मंत्री संजय शिरसाट शिंगणापूर येथे शनी चरणी...
फीड 2C
Anc:- अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ शनिचरणी लिंक झाले आहेत मागच्या काही दिवसांपासून संजय शिरसाठ यांच्यावर आरोपांची मोठी मालिका सुरू झाली आहे हॉटेल खरेदी प्रकरण थोडे माग पडत नाही तोच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली होती अधिवेशन काळामध्ये शिरसाठ यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांचा मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला त्यामुळे अधिवेशन संपताच शिरसाठ यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावर आलेल्या संकटाची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली आहे आपल्याकडून काही चुका होतात किंवा घडतात अशावेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं शिरसाठ यांनी म्हटल आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाट ऑन एकनाथ शिंदे
Anc-
अधिवेशन काळातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेक आरोप झाले त्यातच त्यांचा घरामध्ये पैशाची बॅग असलेला एक व्हिडिओ समोर आला त्यामुळे शिरसाठ यांच्यासह शिवसेना शिंदे गटावरच विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाठ यांना खाजगी सुनावल्याची चर्चा आहे याबाबत शिरसाट यांना विचारलं असता असे कुठलेही चर्चा आपल्या सोबत झालेली नाही आपल्याला समाजात जाऊन काम करण्याचा सल्ला शिंदे साहेबांनी दिला असल्याचं म्हटलं आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाठ ऑन विजय वडट्टीवार
Anc:-
अधिवेशनाच्या शेवटी शेवटी प्रकरण बाहेर आलं यावरून विरोधकांनी मोठे रान उठवलं त्यातच काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी हे प्रकरण जुनाच असून या प्रकरणाची माहिती सत्ताधाऱ्यांना देखील असल्याचा खळबळ जनक खुलासा केला आणि या प्रकरणामुळेच शिंदेंचे सरकार स्थापन झाला असल्याचं म्हटलं आहे यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी वडट्टीवार यांना कधीही कुठलेही शोध लागतात असं सांगत या लोकांना सत्ता गेली त्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला आहे त्यांची आम्ही फार चिंता करत नसल्यास म्हटलं आहे
बाईट:- संजय शिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
14
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 19, 2025 16:03:47Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1907ZT_INDAPURBHARNEFUT
FILE 2
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचा हटके अंदाज.... अधिवेशनातून वेळ मिळताच तीन वर्षाच्या नातवा सोबत खेळणे फुटबॉल..... मंत्री भरणे आणि नातू आरुज याचा फुटबॉल खेळताना चा व्हिडिओ झाला व्हायरल....
Anchor_ राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात, आता मंत्री भरणे यांचा आपल्या तीन वर्षाचा नातू आरुज सोबत फुटबॉल खेळताना चा एक व्हिडिओ समोर आलाय. सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनातून वेळ मिळताच भरणे आपल्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले. याच वेळी आपला तीन वर्षाचा नातू आरुज याच्या सोबत मंत्री भरणे फुटबॉल खेळताना पाहायला मिळालेत.
14
Share
Report