Back
91 वर्षीय आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची भीषण कहाणी!
Kolhapur, Maharashtra
Story':- Kop Badyachiwadi PKG
Feed:- 2C
Feed :- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरानजीक असणाऱ्या 40 जणांच्या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने 91 वर्षीय आजीला बैलगाडीत घालून उपचारासाठी न्यावं लागलं आहे.. हे भीषण चित्र लोकप्रतिनिधी आणि सरकारला लाजवेल असंच आहे. कारण या रस्त्यावरून चालत जात असताना गुडग्याभर चिखलातून वाट काढत जावे लागत..
VO 1:- ही दृश्ये आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील्या बड्याचीवाडी खोरी वसाहती मधील .. खोरी वसाहत मधील 91 वर्षीय सुंदराबाई दळवी यांना अर्धांग वायूचा झटका बसला, त्यामुळे तातडीने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेणे आवश्यक होत.. पण वस्तीवर जायला रस्ता नाही, त्यामुळे चिखलाने माखलेल्या याच रस्त्यावरून सुंदराबाईना नाईलाजास्तव बैलगाड्याच्या छकडामधून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. बड्याचीवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीच्या छकडातून नेण्याची वेळ आलीय... आजीला सध्या गडहिंग्लज मधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी ऍडमिट केलय.. त्यामुळे त्याचे चिरजीव अर्जुन दळवी हे रोज अशाच पद्धतीने चिखलातून वाट काढत ये जा करत आहेत.. सध्या आईची परिस्थिती चिंताजनक आहे.. अशा परिस्थितीत ये जा कशी करायची असा प्रश्न त्यांना सतावतोय.
Byte :- अर्जुन दळवी, ग्रामस्थ
VO 2:- गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथे अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी या ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.. ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या याच वसाहतीवर गेल्या.. तरी देखील वहिवाटीचा रस्ता असणाऱ्या रस्त्याची डाक डूजी झालेली नाही..
Byte :- बाबुराव दळवी, ग्रामस्थ
VO 3:- 40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती, पण निवडणूक संपतात सोयीस्कररित्या जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठ्यांसह लहानांची अक्षरशा फरफट सुरू आहे.
Byte संचित दळवी
Byte अनिल दळवी
VO 4 :- सुंदराबाई सिंधू दळवी याच्या सारख्या अनेक रुग्णांना हॉस्पीटल पर्यंत न्यायचे असेल तर हीच परिस्थिती.. 90 वर्षीय सुंदराबाई यांना मतदानाला नेण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी वाहनाची व्यवस्था केली.. पण नंतर मात्र यांना त्याचा वीसर पडला. बड्याचीवाडीची पासून या वस्तीला येण्यासाठी एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचा रस्ता आहे.. पण हा रस्ता खाजगी वहिवाटेतून जात असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पक्का रस्ता करायला विरोध केलाय. कोर्टाने देखील जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत.. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या रस्त्याची डाग डुजी करणार असल्याचं आश्वासन दिलय.
Byte:- ऋषिकेश शेळके, तहसीलदार गडहिंग्लज
VO 5 :- खाजगी मालमत्तेतून जाणारा हा रस्त्याला विरोध केला असला तरी चार ते पाच पिढ्यांपासून ही लोक हाच वहाटीचा रस्ता वापरतात.. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.. अन्यथा लाल फितीच्या कारभारात या लोकांना अशाच पद्धतीने जीव धोक्यात घालून अशी बिकट वाट तुडवत राहावे लागणार आहे..
End P2C :- प्रताप नाईक, प्रतिनिधी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement