Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

बदलापूरच्या भोज धरणावर पर्यटकाची मस्ती, जीव वाचवण्याचा व्हिडिओ व्हायरल!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 03, 2025 09:40:04
Ambernath, Maharashtra
बदलापूर जवळील भोज धरणावर पर्यटकाची मस्ती अंगाशी पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीची केली सुटका Bdl kondeshvar Anchor बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातुन निघणाऱ्या पाण्याशी मस्ती करणे एका पर्यटकाला चांगलंच अंगाशी आलं, या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या व्यक्तीला त्याच्या सोबतच्या साथीदार आणि इतर पर्यटकांच्या मदतीने वाचवण्यात आलं , या व्यक्तीला इतर पर्यटकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे . या भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात, मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात मात्र अशी मस्ती ही पर्यटकांच्या जीवावर बेतते , पर्यटकांच्या अशाच वागण्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर शासनाकडून बंदी घालण्यात येते  चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement