Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

दारू पिऊन शाळेत आलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ झाला व्हायरल!

dnyaneshwar patange
Jun 28, 2025 10:30:40
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव/परंडा DHARA_TEACHER जिल्हा परिषद शाळेत गुरुजी दारूच्या नशेत, ग्रामस्थांनी केले व्हिडिओ चित्रण सोमवार पासून दारू पिणार नाही शिक्षकाने गावकऱ्यांना दिले आश्वासन गावकऱ्यांनी केली गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार Anchor धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने थेट वर्गावर दारू पिऊन एन्ट्री केली. या शिक्षकाच्या वारंवार अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यासह गावकरी परेशान झालेत. शिक्षक बी एस मोहोळकर या गुरुजींनी आज दारू पिऊन वडगाव येताच हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात आला त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि सरपंच यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, सदस्य आणि पालक शाळेत दाखल झाले. त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता. या संपूर्ण घटनेचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केले. संबंधित शिक्षकाला यापूर्वीही मद्यपान करून शाळेत न येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.माञ शिक्षकाचे दारु पिणे थांबले नाही आज याप्रकरणी गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement