Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

ठाकुर्ली उड्डाणपूल रखडला, मनसे-ठाकरे गटाचा आक्रमक विरोध!

ATISH BHOIR
Jun 30, 2025 11:02:35
Kalyan, Maharashtra
रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलाबाबत मनसे सह ठाकरे गट आक्रमक पुलावर मनसे आणि ठाकरे गटाचे एकत्रित आंदोलन प्रतीकात्मक विमान निवडून नोंदवला सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा निषेध प्रतिकात्मक इन्फ्रामॅन आणून खासदार श्रीकांत शिंदे नाटोला Anchor :- डोंबिवली जवळील ठाकुरली येथील 90 फीट ला जोडणारा उड्डाणपूल हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे .बाधितांच्या मोबदल्याअभावी हा पूल रखडल्याचे बोलले जात आहे . गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ हा पूल पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने याबाबत मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय .डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केलं. या पुलावर प्रतिकात्मक विमाने रॉकेट उडवून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात प्रतीकात्मक इन्फ्रा मॅन देखील आणण्यात आला होता खासदार श्रीकांत शिंदे समर्थक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे इन्फ्रा मॅन म्हणून बॅनर लावले होते.. या पार्श्वभूमीवर मनसेने प्रतीकात्मक इन्फ्रा मॅन आणून अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की ,"मनसेचे माजी आमदार व नेते राजू पाटील यांनी 30।जूनपर्यंत जर या पुलाचे काम सुरू झालं नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता .हा ब्रिज बनवण्यासाठी 2002 साली सुरुवात केली मात्र अजूनही हा ब्रिज पूर्ण होत नाही या पुलासाठी 42 करोडचे टेंडर काढलं होतं ..24 करोड ठेकेदाराला देऊन देखील हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे . या ब्रिज साठी कोणते रॉकेट सायन्स लागलं त्यासाठी प्रतीकात्मक सायंटिस्ट आणि इन्फॉर्म बोलावलं आहे त्यांच्या या ठिकाणी सत्कार केला या ठिकाणी भविष्यात उडून जावं लागेल आम्हाला हवेत उडणारे कार आणि बाईक विकत घ्यावे लागतील असा टोला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना लगावला . Byte :- प्रकाश भोईर ( मनसे जिल्हाध्यक्ष )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement