Back
रत्नागिरीत रात्रीच्या वेळी दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार!
Ratnagiri, Maharashtra
अँकर - रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला परिसरात अज्ञातानं तीन दुचाकी जाळल्यात. मध्यरात्रीच्या वेळी सदरच्या दुचाकी जाळण्यात आल्यात. याबाबत रत्नागिरी पोलिस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात दुचाकी जाळण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळाची पाहणी केलीय. यानंतर त्यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
लोकेशन - पेठकिल्ला, रत्नागिरी
byte - नितीन बगाटे, पोलिस अधिक्षक, रत्नागिरी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Nsk_nasikpolitics
Feed by 2C and mojo
Anchor नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले आहेत. 2025 च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नेत्यांचे पक्षांतर, नव्या आघाड्या आणि प्रभाग रचनेतील बदल यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Vo 1 नाशिक उभाठा गटाचे हे आहेत विलास शिंदे.... सध्याचे महानगर प्रमुख असलेले विलास शिंदे आता आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करू लागले आहेत... नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची निमित्त आयोजित केलेल्या मिसळ पार्टीमध्ये राजकीय पक्षांतर करण्याची वेळ आली असल्याचं आग्रह त्यांना केलाय...माजी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप आणि माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केलाये. तर दुसरीकडे, ठाकरे गटाला मोठा धक्का देत महानगरप्रमुखांसह आठ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता विलास शिंदे सुद्धा नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत
Byte 1 विलास अण्णा शिंदे नाराज महानगरप्रमुख उबाठा सेना ( सकाळी वन टू वन मध्ये पाठवला आहे)
Vo 2 यामुळे नाशिक शहरात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रभाग रचनेत बदल आणि सत्तेची समीकरणे यामुळे नेते आपली पावले जपून टाकत आहेत. उभाठा गटाने मात्र पक्षांतर करणारे संधी साधू नेते असल्याचे आरोप करत आम्ही भक्कम असल्याचा दावा केला आहे
Byte दत्ता गायकवाड ज्येष्ठ नेते डीजे सूर्यवंशी जिल्हाप्रमुख उबाठा सेना
gfxनाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 11 ते 16 जून 2025 दरम्यान प्रगणक गट तयार झाले असून, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
vo 3 मात्र, या प्रभाग रचनेवरून महायुतीतच अंतर्गत कलह दिसून येत आहे. आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी उभाटा गटाचे आणि महायुतीतील काही अजून काही नेते भाजपा सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. . भाजप स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतेय. भाजप आणि शिंदे गटात प्रभाग रचनेवरून रस्सीखेच सुरू असून, स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर निवडणूक लढवावी अशी स्थानिकांची इच्छा आहे
Byte सुनील केदार शहराध्यक्ष भाजपा
देवयानी फरांदे आमदार भाजपा ( या दोघांपैकी एक बाईट बीजेपी बाईट नावाने लाईव्ह युने मिळेल )
Vo 4 नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, राज्यातील राजकीय ताकदीची कसोटी आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिलीतून मुंबईच्या मोर्चासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे एकत्र निघणार..
Anc..डोंबिवलीच्या पलावा ब्रिज च्या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाकडून एकत्र येत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आले होते याची चर्चा संपूर्ण राज्यांमध्ये झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पाच तारखेला हिंदी भाषा संक्ती विरुद्ध आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोठो ना भविष्य असा मोठा असा मोर्चा निघणार आहेत या मोर्चासाठी डोंबिवलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकत्र निघणार आहे
Vo..महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबई मध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या एकत्र आल्याने एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मी हा मोर्चाला भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे साहेबांनी जे पत्र दिलेले आहे ते पत्र डोंबिवली मधील मराठी कलाकार डॉक्टर वकील की सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना उद्धव ठाकरे यांचे पत्र पोचणार आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी सहभागी होतील मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील ला देखील आम्ही आव्हान करणार आहे की आमच्याबरोबर एकत्र लोकलचा प्रवास करत मुंबईला यावे आणि मोर्चे सहभागी व्हावे
Byte.. दीपेश म्हात्रे
जिल्हा प्रमुख
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्ह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी कलम 175 (3) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश धुळे न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली होती. कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडून देखील पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने माजी आमदार अनिल गोटे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी धुळे न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाची दखल घेत धुळे न्यायालयाने BNSS चे कलम 175/3 नुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश धुळे पोलिसांना दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास आपण औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून गुन्ह्यात धुळे पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी करणार असल्याचे अनिल गोटे यांनी म्हांटल आहे.
Byte- अनिल गोटे माजी आमदार
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :– AMT_BAWANKULE_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरशी जोडण्याचा प्रयत्न करू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अँकर :- शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग हा अमरावतीच्या प्रति पंढरपूर असलेल्या कौंढणपूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याच वक्तव्य केला आहे त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहे. शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पर्यंत आला असून वर्धा जिल्ह्या लगत असलेल्या कौंडण्यपूरलाही हा मार्ग जोडण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा पाहायला मिळत आहे. मी लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहे आणि इतर मार्गाने कौंडण्यपुरला शक्तिपीठ महामार्ग कसा जोडता येईल हा प्रयत्न आम्ही करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितला आहे.
बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यातील बेने इस्रायली समाज ......
अँकर - बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील लोक समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग नवगावच्या किनाऱ्यावर आली.
स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही.
बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात.
मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात.
हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत.
बाईट - ए. बी. आवासकर , पुरुष
बाईट - मार्गारेट तळकर, तरुणी
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट आहे
-------
नागपूर
* नागपूरात कचरा उचलणारा ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात
* वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या अपघातात घटनास्थळीच दुचाकी स्वार ठार तर 2 जण गंभीर जखमी..
* नितीन पंजेश्वर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव तर दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
* कचरा संकलन करणाऱ्या ट्रकच्या चालकाला वाहनासह वाठोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत..
Byte हरीश बोराडे, पोलीस निरीक्षक, वाठोडा पोलीस स्टेशन
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, यवतमाळच्या मडकोना ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देऊन, ग्रामस्वच्छता साधण्यासोबतच आर्थिक उन्नती देखील साधली आहे. घनकचरा व्यवस्थापनामुळे गावातील कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचा उद्देश साधण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी वितरित केली, त्यातून ओला आणि सुखा कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येऊन कंपोस्ट खत तयार करण्यात आले या खताच्या विक्रीतून ग्रामपंचायतला आर्थिक उत्पन्न देखील मिळाले.
बाईट : नरहरी हरगुडे सरपंच
सुधीर क्षीरसागर ग्रामपंचायत अधिकारी
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : पेट्रोल पंपा समोरील साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅसचा भीषण स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही...
Anc : शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील एका साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. दुपारी किचन रूम मध्ये असलेल्या घरगुती गॅसच्या तीन टाक्याला अचानक आग लागली. आगीत एका टाकीचा भीषण स्फोट झाला. यावेळी हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. जिथे गॅसच्या टाकीचा स्फोट झाला त्याच परिसरात केवळ 100 फुटाच्या अंतरावर पेट्रोल पंप होते. त्यामुळे मोठी हाणी टळली आहे. स्फोटात घरगुती गॅस आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड शहरातील अनेक हॉटेल मध्ये घरगुती गॅस सर्रासपणे वापरण्यात येतात. या स्फोटानंतर हॉटेल व्यावसायिकांकडून अनाधिकृत रित्या गॅस वापराचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2706ZT_WSM_BRIDGE_BROKE_WKT
WSM_BRIDGE_BROKE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी व काच या नदीला पूर आला आहे.या पुरामुळे कुकसा ते मागुळ झनक मार्गावरील अंचळजवळचा पूल वाहून गेला.परिणामी या मार्गावरील वाहतूक २४ तासांपासून ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर उशिरा का होईना, प्रशासनाने रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. दरम्यान, अद्याप वाहतूक पूर्ववत झाली नसून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.याचबाबत अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई
डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ही ठोकल्या बेड्या
आरोपी मध्ये दोन पुरुष एक 21 वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्रा चे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत करत होते एमडी ड्रग्सची तस्करी
हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाणे सह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती
सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहे
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हायप्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली एकदा पुन्हा चर्चेत आली आहे
Byte अतुल झेंडे ( कल्याण dcp )
0
Share
Report