Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

साताऱ्यातील कर्मचाऱ्यांचा असहकार आंदोलनाचा इशारा, सरकारची निष्क्रियता चुकवणार!

TUSHAR TAPASE
Jun 30, 2025 11:02:53
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_AAROGYA_SEVAK सातारा – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे आणि अधिक सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्याचा निर्णय दिनांक 14 मार्च 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला होता. मात्र, सव्वा वर्ष उलटल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याविरोधात साताऱ्यातील संतप्त कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे.कर्मचाऱ्यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह संबंधित सचिव आणि आरोग्य आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिली असून, अनेकदा भेटी घेऊन समायोजन, वेतनवाढ, बदली धोरण, EPF आणि विमा योजनांबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.या निष्क्रियतेविरोधात कर्मचारी लवकरच "लक्षवेधी असहकार आंदोलन" छेडणार असून, शासनाने त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. Byte -
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement