Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

अंबरनाथच्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांनी घेतला पुढाकार!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 27, 2025 05:01:43
Ambernath, Maharashtra
पोलिसांच्या सीसीटीव्हीसाठी शहरभर खड्डे! खोदलेले रस्ते न बुजवताच ठेकेदार पसार अखेर रिक्षाचालकांनी बुजवले पोलिसांचे खड्डे Amb potholes Anchor : अंबरनाथ शहरात पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रोजेक्टसाठी जागोजागी रस्ते खोदण्यात आलेत. मात्र काम झाल्यावर हे खोदलेले रस्ते न बुजवताच ठेकेदार पसार झालाय. त्यामुळं अंबरनाथच्या रिक्षाचालकांनी स्वतः हे खड्डे बुजवले आहेत. Vo : अंबरनाथ शहराच्या अनेक भागांमध्ये पोलिसांच्या ठेकेदाराने खड्डे खोदून ठेवले आहेत. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्याच ठेकेदाराची असून ठेकेदार मात्र काम होताच पसार झाला आहे. त्यामुळं पोलिसांनी हा ठेकेदार सीसीटीव्हीत कुठे दिसतो का ते बघावं, आणि त्याला शोधून आणत खड्डे बुजवायला लावावेत, अशी उपहासात्मक टीका अंबरनाथकर करू लागलेत. तर काही रिक्षाचालकांनी स्वतःच हे खड्डे बुजवले असून भीक नको पण कुत्रा आवर, असं म्हणायची वेळ सध्या अंबरनाथकरांवर आली आहे. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement