Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: नर्सने अँसिड लावल्याने महिलेच्या पोटाला गंभीर इजा!

NITESH MAHAJAN
Jun 27, 2025 16:32:27
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2706ZT_JALNA_DELIEVERY(15 FILES) जालना | ब्रेकिंग | प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसूतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना करताना नर्सने जेली ऐवजी अँसिड लावल्याचा रुग्ण महिलेच्या नातेवाईकांचा आरोप महिलेने दिला बाळाला जन्म,पण महिलेच्या पोटासह गुप्तांगाला गंभीर दुखापत या प्रकारानंतर नर्स दोन तास फरार झाल्याचाही नातेवाईकांचा आरोप महिलेवर उपचार सुरु भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार आला समोर अँसिड नव्हे तर फिनाईल सदृश्य पदार्थ लावला गेल्याची शक्यता, घटनेचा अहवाल बोलावला: जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती दोषींवर कारवाई करा,महिला रुग्णाच्या नातेवाईकांची मागणी अँकर : जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना महिलेच्या पोटाला नर्सने अँसिड लावल्याचा आरोप या महिलेसह तिच्या नातेवाईकांनी केलाय. प्रसूतीपूर्वी बाळाच्या हृदयाच्या ठोके ऐकण्यासाठी ही डॉपलर टेस्ट केली जाते.या रुग्ण महिलेच्या पोटाला अज्ञात पदार्थ लावण्यात आल्यानं या महिलेच्या पोटासह गुप्तांगाला गंभीर ईजा झालीय.या प्रकारानंतर नर्स गायब झाल्याचा आरोपही जखमी महिलेच्या नातवाईकांनी केला.दरम्यान या घटनेनंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ सुखरूप आहे मात्र महिलेला गंभीर ईजा झाल्यानं या महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहे. या प्रकारानंतर या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी महिलेच्या नातवाईकांनी केलीय.तर चुकून हा प्रकार घडलाय.डॉपलर टेस्ट करताना अँसिड नव्हे तर फिनाईल सदृश्य पदार्थ वापरला गेला असावा अशी शक्यता जिल्हा शल्य चिकित्सकांनी व्यक्त केलीय.दरम्यान या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेत. बाईट:शिला भालेराव जखमी,रुग्ण महिला बाईट: साखराबाई भालेराव ,रुग्ण महिलेची सासू बाईट :रवी पाखरे,महिलेचा नातेवाईक बाईट : डॉ.राजेंद्र पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय जालना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement