Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर बलात्कार प्रकरणात आयोगाची नाराजी, प्रशासनावर ताशेरे

ASHISH AMBADE
Jun 27, 2025 15:33:42
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_SC_COMM_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:--  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा गावातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष पोचले गावात, मात्र प्रशासकीय अनास्थेने आयोगाने व्यक्त केली नाराजी, तपासात हयगय- माहितीचा अभाव आणि मदत देण्यात कुचराईसाठी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.  अँकर:---चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा गावातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष एड. धर्मपाल मेश्राम या गावात पोचले. त्यांनी कुटुंबियांशी चर्चा करत सत्यस्थिती जाणून घेतली. मात्र प्रकरणाच्या प्रशासकीय अनास्थेबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली.  तपासात हयगय- माहितीचा अभाव आणि मदत देण्यात कुचराईसाठी  त्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. 20 मे रोजी या अल्पवयीन मुलीचा गावातील विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळला. पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र मृतक मुलीचे आईने आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचेवर ९ जणांनी लैंगिक अत्याचार करून हत्या केली असा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांनी  अक्षम्य निष्काळजीपणा केला. अत्याचार प्रकरणी आरोप अमोल दोडके याला अटक केली. त्याचेवर पास्को सहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उर्वरित आठ आरोपींना मोकळे सोडण्यात आले.  पोलिसांनी या प्रकरणात अजून पर्यंत कोणाचेही बयान नोंदवले नाही. शवविच्छेदन भद्रावतीला करण्याऐवजी चंद्रपूरला करण्यात आले. मृतदेह जमिनीत पुरवण्याऐवजी जाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाला आयोगापुढे संपूर्ण माहितीसह पुढील बैठकीत उपस्थित राहण्याच्या कठोर सूचना याप्रसंगी देण्यात आल्या. बाईट १) एड. धर्मपाल मेश्राम,  उपाध्यक्ष, राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement