Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चंद्रकांत पाटलांचा राज आणि उद्धव ठाकरेंवर तीव्र सवाल! हिंदी सक्ती का अर्थ?

Sarfaraj Musa
Jun 27, 2025 17:30:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - हिंदी सक्ती नाही, मग मोर्चा कशासाठी आणि मागणी काय ? मंत्री चंद्रकांत पाटलांचा राज आणि उद्धव ठाकरेंना सवाल अँकर - सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कश्यासाठी,मागणी काय आणि काय केल्याने समाधान होणार आहे,असं सवाल भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केला आहे.तसेच दीडशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार,मग हिंदी आमच्या मुलांना हिंदी येऊ नये का ? असा देखील सवाल मंत्री चंद्रकांत पाटलांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळेजण राज ठाकरे यांना भेटले आहेत, तरी देखील त्यांच्या मनात किंतु असेल तर ठीक आहे,पण देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या शब्दात सांगितले आहे, पण यात अवघड काय आहे हे कळलं नाही असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याचा धाडस कमी करणार नाही,असं मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे, सांगलीच्या मिरजेमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement