Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003

मुंबईतील ट्रक चोर टोळीचा पर्दाफाश, 6 ट्रक जप्त!

Manoj Kulkarni
Jun 27, 2025 18:00:58
Mumbai, Maharashtra
अँकर -- मुंबईतील गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांनी ट्रॅक चोर टोळीतील दोन चतुर ट्रक चोरांना सुरत येथून अटक केली. या चतुर चोरांकडून 6 ट्रक जप्त करण्यात आले आहेत. ही ट्रक चोर टोळी मुंबईतून ट्रक चोरून बनावट कागदपत्रे तयार करून सुरत, गुजरात, राजस्थान येथे नेऊन स्वस्त दरात विकायची. 6 जून रोजी वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 ट्रक चोरीला गेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सूत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. तपासात एक आरोपी सुरत येथे असल्याचे निष्पन्न झाले. वनराई पोलिसांनी सापळा रचून आरोपी नर्सिंग रामस्वरूप सिंग (44) याला अटक केली. जो सुरतमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतो. अधिक तपास केल्यानंतर या टोळीचा सूत्रधार जावेद अब्दुल्ला शेख असल्याचे निष्पन्न झाले. जो छत्रपति संभाजी नगर येथे राहतो. त्यानंतर वनराई पोलिसांनी छत्रपति संभाजी नगर येथून जावेद अब्दुल्ला शेख यालाही अटक केली. जावेद अब्दुल्ला शेख याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात ट्रक चोरीचे ७ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून 6 ट्रक जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींकडून त्यांच्या टोळीत आणखी किती जणांचा समावेश असून महाराष्ट्रात त्यांनी कुठे ट्रक चोरीचे गुन्हे केले आहेत, याचा तपास वनराई पोलीस करत आहेत. Byte- गिरीश बने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस ठाणे) मनोज कुळकर्णी  Vis 2C 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement