Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

84 वर्षीय आजोबाने मंजूला भेटण्यासाठी सोलापूरहून साताऱ्यात कसे पोहचले?

TUSHAR TAPASE
Jun 27, 2025 15:30:40
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 6 FILES SLUG NAME -SAT_MANJU_AJOBA सातारा - मराठी मालिकांमध्ये सध्या लोकप्रिय असलेली कॉन्स्टेबल मंजू ही मालिका अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. या मालिकेतील मुख्य पात्र ‘मंजू’चे प्रेम इतके वाढले आहे की एक 84 वर्षीय आजोबा दत्तू कारणे यांनी तिची भेट घेण्यासाठी सोलापूरहून थेट साताऱ्यापर्यंत प्रवास केला. दत्तू कारणे हे मालिका नियमित पाहतात आणि मंजूचे काम त्यांना विशेष भावते. मंजूच्या काळजीवाहूपणाने आणि लोकांप्रती असलेल्या प्रेमळ वृत्तीमुळे ते खूप प्रभावित झाले. मालिकेतील एका भावनिक सीननंतर त्यांनी ठरवलं – “तिला प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे! मग काय ते कसे बसे हे आजोबा मंजूचा काळजीपोटी साताऱ्यात पोहचले.साताऱ्यातील एका ठिकाणी पोलिस ठाण्यात या मालिकेचं शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट खऱ्या खुऱ्या पोलिस ठाण्यात पोहचले आणि मंजु ची चौकशी करू लागले.सातारा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना काहीच समजेना .अखेर हे आजोबा मंजु मालिकेतील पोलिस कॉन्स्टेबल ला शोधतायत हे समजले मग या खऱ्या पोलिसांनी या आजोबांना मंजु चे चित्रीकरण सुरू असणाऱ्या सेट वर पोहचवले.मग काय अभिनेत्रीनेही त्यांच्या प्रेमाला मान देत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. byte - मंजू (मोनिका राठी) वीओ 2- ही घटना केवळ मालिकेच्या लोकप्रियतेचंच नव्हे, तर आजच्या काळातही टेलिव्हिजनमधील कथानक प्रेक्षकांच्या मनाला किती भिडू शकतं याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement