Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू: गावकऱ्यांचा रोष!

ASHISH AMBADE
Jun 30, 2025 11:10:42
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 3006ZT_CHP_POSTMAN_DEATH_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुधोली प्रा. आ. केंद्रात डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे 25 वर्षीय युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, आरोग्य विभागाने फेटाळले आरोप अँकर:-- डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय युवा पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकित उर्फ कुणाल गायकवाड असं या पोस्टमास्टरचं नाव असून भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे पोस्टमास्टर म्हणून ते कार्यरत होते. काल पहाटे अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरने तपासणी करून त्यांच्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असल्याचे सांगितलं आणि सोबतच तातडीने त्यांना चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी एका मेटाडोर मधून पोस्टमास्टर यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष असून त्यांनी या घटनेला डॉक्टरांची हलगर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते डॉक्टर हे खाजगी कामांसाठी रुग्णवाहिका वापरतात मात्र रुग्णांना रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करतात. या घटने विरोधात दोषी डॉक्टरवर कारवाई ची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनाने खुलासा दिलाय. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं आहे. रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती रुग्णवाहिका न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केलाय. बाईट १) मयूर धारणे, ग्रामस्थ बाईट २)  तुळशीराम श्रीरामे, माजी सभापती, पंचायत समिती बाईट ३)  डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement