Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूरची कुंकवाची बाजारपेठ: भाविकांची खरेदीची धूम!

SACHIN KASABE
Jul 03, 2025 04:32:34
Pandharpur, Maharashtra
03072025 Slug - PPR_KUNKU_BUKKA feed on 2c file 02 -------- Anchor - आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणारे भाविक कुंकू आणि विठूरायाचा बुक्का आवर्जून खरेदी करतात. विशेषतः महिला भाविकांकडून वारी संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध आणि चंदनाला मोठी मागणी असते. हळदीपासून बनवलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवालादेखील विशेष पसंती मिळते. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात असलेल्या या मागणीमुळे पंढपुरात जवळपास 100 टन कुंकू विक्रीसाठी लागतं. प्रत्येक वारकरी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघताना विठूरायाचा कुंकू आणि बुक्क्याचा प्रसाद गावाकडे पाहुणे, मित्र आणि शेजाऱ्यांना आपुलकीनं देत असतो. आपल्या ज्या नातेवाईकांना वारीला येणं शक्य झालं नाही, त्यांना प्रसादाच्या रूपानं का होईना, विठूरायाचं दर्शन व्हावं, यासाठी पंढपुरातून कुंकू बुक्का सोबत नेला जातो.ही प्रथा वारकरी संप्रदायानं पिढ्यानपिढ्या जपली असल्यामुळे मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकानं पाहायला मिळतात. म्हणूनच आषाढी यात्रेत 'कुंकवाची बाजारपेठ' भरली असं म्हणतात. सोबतच साखर फुटाणे,पेढा उदबत्ती अशा प्रासादिक वस्तूंच्या खरेदीला सुद्धा भाविक पसंती देतात ------- Byte - राजेंद्र वट्टमवार, प्रासादिक वस्तू विक्री व्यापारी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement