Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव: बँक मॅनेजरने ऑनलाइन गेमच्या जाळ्यातून कर्जाचा बनाव केला!

dnyaneshwar patange
Jul 03, 2025 08:04:01
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_ROBARY ऑनलाईन गेम च्या जाळ्यात अडकला, कर्जबाजारी झालेल्या बँक मॅनेजरने रचला चोरीचा बनाव पोलीस तपासात मॅनेजरचा 24 तासात बनाव उघड माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या बँकेतील प्रकार Anchor धाराशिव – ऑनलाइन गेमच्या व्यसनात अडकलेल्या बँक मॅनेजरने तब्बल 25 लाखांच्या चोरीचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गमध्ये माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेत ही घटना घडली. कैलास घाटे असे मॅनेजरचे नाव असून त्याने दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी हल्ला करून डोळ्यात मिरची पूड टाकून रक्कम लुटल्याचा बनाव केला होता. मात्र पोलीस तपासात सत्य समोर आलं. ऑनलाइन गेममुळे झालेल्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी घाटेने हा कट रचल्याचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी संपूर्ण 25 लाखांची रक्कम हस्तगत केली असून पुढील कारवाई सुरू आहे. Byte – रितू खोखर, जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement