Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

बबनराव लोणीकरच्या वादग्रस्त टिपण्णीवर शेतकऱ्यांचा संताप! आंदोलनात लाखोंची बक्षीसाची घोषणा!

GAJANAN DESHMUKH
Jul 03, 2025 08:02:04
Parbhani, Maharashtra
अँकर - शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त टिपणी करणारे माजी मंत्री बबनराव लोणीकरच्या तोंडाला काळ फासेल किंवा चाबूकाने झोडपले त्याला औंढा तालुका प्रमुखाकडून माऊली झाटे यांच्याकडून 1 लाखाचे बक्षीस तर लोणीकरांना जोड्याने मारणार्याला जिल्हाप्रमुखा संदेश देशमुख यांच्या कडून दोन लाख 51 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करून वादग्रस्त वक्तव्य केल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज शेतकेयांचा कर्जमाफी करावी,शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,शेतकर्यांसाठी जुना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करावी. शेतीला 24 तास वीज द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले,यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्याबद्दल अपशब्द काढणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षात कधी ही आल्यास बबनराव लोणीकर यांच्या तोंडाला काळ फासल किंवा त्यांना चाबकाने झोडपले तर 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा औंढा तालुकाप्रमुख माऊली झाटे यांनी केले.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तालुका प्रमुखांच्या पुढे जाऊन बबनराव लोणीकर यांचा बुटाने हाणनाऱ्याला 2 लाख 51 हजार रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा करून वादग्रस्त वक्तव्य केले. बाईट- माऊली झटे- शिवसेना उबठा- तालुकाप्रमुख औंढा बाईट- संदेश देशमुख- जिल्हाप्रमुख,हिंगोली
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement