Back
भंडारा शेतकऱ्यांची धान खरेदी रखडली, सरकारने उद्दिष्ट वाढवावे!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_DHAN_KHAREDI
FILE - 5 VIDEO
उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्याची धान खरेदी रखडली..... सरकारने उद्दिष्ट न वाढविल्यास व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात धान खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 5 लाख 75 हजार क्विंटल धान खरेदीची उद्दिष्ट मिळाल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी पूर्ण झाली आहे, पण भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चांगला उत्पादन झाल्याने आणखी जवळ्पास 25 लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शकतात आहे. सद्या उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे धान तसेच पडून आहे. त्यामुळे शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी होत आहे. अन्यथा कमी दरात व्यापाऱ्याला धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकरी लागवडी करीता पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
BYTE : खेमराज गिरेपुंजे, शेतकरी
BYTE : पुरुषोत्तम हेमने, शेतकरी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ambernath, Maharashtra:
बदलापूर जवळील भोज धरणावर पर्यटकाची मस्ती अंगाशी
पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीची केली सुटका
Bdl kondeshvar
Anchor बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातुन निघणाऱ्या पाण्याशी मस्ती करणे एका पर्यटकाला चांगलंच अंगाशी आलं, या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या व्यक्तीला त्याच्या सोबतच्या साथीदार आणि इतर पर्यटकांच्या मदतीने वाचवण्यात आलं , या व्यक्तीला इतर पर्यटकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे . या भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात, मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात मात्र अशी मस्ती ही पर्यटकांच्या जीवावर बेतते , पर्यटकांच्या अशाच वागण्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर शासनाकडून बंदी घालण्यात येते
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_HEALTH_CENTER_CLOSED
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम च्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रावर गेल्या सात वर्षांपासून बंद स्थितीत असून,मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि आवश्यक आरोग्य सुविधा नसल्यामुळे हे केंद्र कार्यान्वित होऊ शकलेले नाही. परिणामी गावातील रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत असून,यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाकडे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.मात्र संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा नव्याने बांधण्यात आलेल्या इमरतिची दुरावस्था होतं असून
आरोग्य सेवा मिळावी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना,तीच न मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गावात नव्याने इमारत बांधून तयार असतानाही ते आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात यावे,ही आमची मागणी असून,प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेऊन कोळगाव उपकेंद्र सुरु करावे,अशी जोरदार मागणी सध्या गावकऱ्यांकडून होत आहे.
बाईट:विजय शेंडगे,स्थानिक नागरिक,कोळगाव
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop Sanjay Powar Byte
feed:- 2C
संजय पवार बाईट मुद्दे
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम
संजय पवार उपनेते पदाच्या राजीनाम्यावर ठाम
रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्ती रद्द न करण्याचेच संजय पवार यांना उद्धव ठाकरेंकडून संकेत
कोल्हापूर ते मातोश्री लां जोडणाऱ्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा
संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी
कोल्हापुरातून चुकीची माहिती मातोश्री पर्यंत पोहोचते का याची एकदा चौकशी करा
नेत्यांसमोरच संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केली विनंती
संजय पवार यांचा विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांवर आक्षेप
उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यामुळे मी नाराज झालोय
सध्या तरी मी कोणत्याही अन्य पक्षांचा विचार केलेला नाही
अशीच वागणूक मिळणार असेल तर दुसरा पर्याय तरी काय?
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय पवार यांनी व्यक्त केली उद्विग्नता
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Date-3july2025
Rep-prathamesh tawade
Loc-mira bhayander
Slug-MIRAROAD PROTEST
Feed send by 2c
Type -PKG
Slug- मिरा भाईंदर मध्ये अमराठी व्यापाऱ्याला मनसे मारहाण प्रकरण
आज मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यांची बंदची हाक
एकत्र येऊन निषेध केला व्यक्त.
अँकर - मिरारोड मध्ये मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यावरून चोप दिला होता , त्यानंतर आज मनसे विरोधात मीरा-भाईंदर मध्ये जैन , मारवाडी , गुजरात व्यापारी संघटनेने मिरा भाईंदर मध्ये बंदची हाक दिली आहे... शेकडो व्यापारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले..
मिरा रोड पूर्वेच्या हिरवी हॉलमध्ये या सर्व नागरिकांनी जमल्यानंतर हाताला काळया फीती बांधून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आंदोलण केले. ..मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी माहिती समोर येत आहे... अखेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत अशी समजूत काढून वातावरण शांत केले...
बाईट- प्रकाश गायकवाड, डीसीपी.
बाईtu-आंदोलनकर्ते , व्यापारी .
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri bhondu baba
kailas puri, Pune, 3-7-25
feed by 2c
बावधन मधील भोंदू बाबाच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये काय दडलय.. पोलिसांचा शोध सुरू...!हजारो अश्लील व्हिडिओ असण्याची शक्यता...
121 सुनील कुराडे,ACP
Anchor जी साधकांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत असतानाच पोलिसांनी या भोंदू बाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad,सोलोपोशे 0.5md च्या गोळ्याच मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉल च्या 9 गोळ्या,सिमकार्ड आणि pen drive हे साहित्य जप्त केलं आहे भोंदू बाबा इलेक्ट्रॉनिक गॅझेट मध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेणार आहेत.दरम्यान भोंदू बाबा कडे तसेच इतर वैद्यकीय औषधही मिळाली आहेत. त्यांचा नेमका वापर काय आहे याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.याचं संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas 1 to 1 + vis
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट::- लातूरात कॉफीवर जगणाऱ्या आजीबाई... आजीबाईची सर्वत्र चर्चा....
AC ::- लातूरमधून एक अचंबित करणारी आजीबाई समोर आल्या आहेत.. ८० वर्षांच्या प्रेमाबाई पाटील या मागील तब्बल ५० वर्षांपासून अन्नाचा एकही घास घेतलेला नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं त्या फक्त कॉफी घेतात, आणि आजही ठणठणीत आरोग्यदायी जगत आहेत. लातूर शहरात राहणाऱ्या प्रेमाबाई पाटील यांनी १९७० च्या दशकात अन्न त्याग केला. तेव्हापासून त्या केवळ दिवसातून चार वेळा कॉफी पितात. ना औषधं, ना डॉक्टर, ना आजार… आणि तरीही त्यांचे आरोग्य उत्तम आहे. या आजीबाईच्या अचंबित करणार्या सर्व गोष्टी मुळे लातूरसह वैद्यकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्या त्या ‘कॉफीवर जगणाऱ्या आजी’ म्हणून लातूर जिल्ह्यात ओळखल्या जात आहे कॉफीमुळे आजी ठणठणीत असल्याचा दावा
बाईट ::- प्रेमाबाई पाटील
बाईट ::- पुतण्या
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Story':- Kop Badyachiwadi PKG
Feed:- 2C
Feed :- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरानजीक असणाऱ्या 40 जणांच्या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने 91 वर्षीय आजीला बैलगाडीत घालून उपचारासाठी न्यावं लागलं आहे.. हे भीषण चित्र लोकप्रतिनिधी आणि सरकारला लाजवेल असंच आहे. कारण या रस्त्यावरून चालत जात असताना गुडग्याभर चिखलातून वाट काढत जावे लागत..
VO 1:- ही दृश्ये आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील्या बड्याचीवाडी खोरी वसाहती मधील .. खोरी वसाहत मधील 91 वर्षीय सुंदराबाई दळवी यांना अर्धांग वायूचा झटका बसला, त्यामुळे तातडीने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेणे आवश्यक होत.. पण वस्तीवर जायला रस्ता नाही, त्यामुळे चिखलाने माखलेल्या याच रस्त्यावरून सुंदराबाईना नाईलाजास्तव बैलगाड्याच्या छकडामधून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. बड्याचीवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीच्या छकडातून नेण्याची वेळ आलीय... आजीला सध्या गडहिंग्लज मधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी ऍडमिट केलय.. त्यामुळे त्याचे चिरजीव अर्जुन दळवी हे रोज अशाच पद्धतीने चिखलातून वाट काढत ये जा करत आहेत.. सध्या आईची परिस्थिती चिंताजनक आहे.. अशा परिस्थितीत ये जा कशी करायची असा प्रश्न त्यांना सतावतोय.
Byte :- अर्जुन दळवी, ग्रामस्थ
VO 2:- गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथे अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी या ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.. ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या याच वसाहतीवर गेल्या.. तरी देखील वहिवाटीचा रस्ता असणाऱ्या रस्त्याची डाक डूजी झालेली नाही..
Byte :- बाबुराव दळवी, ग्रामस्थ
VO 3:- 40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती, पण निवडणूक संपतात सोयीस्कररित्या जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठ्यांसह लहानांची अक्षरशा फरफट सुरू आहे.
Byte संचित दळवी
Byte अनिल दळवी
VO 4 :- सुंदराबाई सिंधू दळवी याच्या सारख्या अनेक रुग्णांना हॉस्पीटल पर्यंत न्यायचे असेल तर हीच परिस्थिती.. 90 वर्षीय सुंदराबाई यांना मतदानाला नेण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी वाहनाची व्यवस्था केली.. पण नंतर मात्र यांना त्याचा वीसर पडला. बड्याचीवाडीची पासून या वस्तीला येण्यासाठी एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचा रस्ता आहे.. पण हा रस्ता खाजगी वहिवाटेतून जात असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पक्का रस्ता करायला विरोध केलाय. कोर्टाने देखील जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत.. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या रस्त्याची डाग डुजी करणार असल्याचं आश्वासन दिलय.
Byte:- ऋषिकेश शेळके, तहसीलदार गडहिंग्लज
VO 5 :- खाजगी मालमत्तेतून जाणारा हा रस्त्याला विरोध केला असला तरी चार ते पाच पिढ्यांपासून ही लोक हाच वहाटीचा रस्ता वापरतात.. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.. अन्यथा लाल फितीच्या कारभारात या लोकांना अशाच पद्धतीने जीव धोक्यात घालून अशी बिकट वाट तुडवत राहावे लागणार आहे..
End P2C :- प्रताप नाईक, प्रतिनिधी
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_GOSE_DAM
FILE - 1 VIDEO
गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पानी पातळीत वाढ झाली आहे. भविष्यात दमदार पाऊस झाला तर गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो होण्याची शकता असल्याने आज गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवज्या पैकी 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे. या 9 दरवाज्यातून 1158 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_JARANGE(1 FILE)
जालना | ब्रेकिंग
न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची
मुदतवाढ
समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार : जरांगे
मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतली, सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही,निर्णयाचं स्वागत पण एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे : जरांगे
समितीनं रेकॉर्डही तपासले पाहिजे,कुणबी प्रमाणपत्र वाटपही झाले पाहिजे
सगे-सोयरेची अंमलबजावणी करा
मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा
हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करा,सातारा, बॉम्बे गॅझेटही लागू करा
अँकर | कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारनं 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिलीय.30 जून रोजी या समितीची मुदतवाढ संपुष्टात आली होती. अखेर राज्य सरकारनं 2 जुलै रोजी नवा अध्यादेश काढत 31 डिसेंबरपर्यत न्या.शिंदे समितीला मुदतवाढ दिलीय.दरम्यान राज्य सरकारने या समितीच्या मुदतवाढीबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
न्या.संदीप शिंदे समितीला मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतलीय. सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही या निर्णयाचं स्वागत पण शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलंय.समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करण्याबरोबरच आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार असा ईशारा जरांगे यांनी दिलाय.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- आमदार धमकी
फीड 2C
अँकर:-अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी संग्राम जगताप यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली आहे. या संदर्भात स्वीय सहाय्यका कडून कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबरच लोकेशन परराज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून सायबर सेलच्या माध्यमातून अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे.
बाईट:- अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी.
0
Share
Report