Back
बिबट्याचा हल्ला: आजोबांनी नातवाची प्राण वाचवली!
Shirdi, Maharashtra
Anc - कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले.ही घटना २९ जून रोजी घडली.
V/O - कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल अजय आहेर (वय ४) हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला. त्याच वेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले.नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर तत्काळ उसाच्या शेतात धावले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले. ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान , घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.
बाईट - मच्छिंद्र आहेर -आजोबा
बाईट - निलेश रोडे -वनपरिक्षेत्र अधिकारी, कोपरगाव
कपिल विष्णू सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य, येसगाव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement