Back
महागाईचा कहर: भाज्या शंभरी गाठतात, गोरगरीबांना मोठा फटका!
Yeola, Maharashtra
अँकर :-सध्या महागाईचा कहर सुरूच असून पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस सिलेंडरसह इतर जीवनावश्यक वस्तू पाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झाला आहे. मनमाड, येवलासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली असून डाळी,चिकन,मटण,मासे यांच्या किमतीतीत ही मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे.महागाईचा सर्वात जास्त फटका गोरगरीब आणि मध्यम वर्गीयना बसत आहे. मे महिन्यात सलग झालेला अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका बसून भेंडी पासून शेवगा पर्यत,
गवार पासून फ्लावर,कारले
दोडके पर्यत जवळपास सर्वच भाज्यांना बसला. शेतात पाणीचं पाणी झाल्याने भाजीपाला खराब झाला त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने भावात वाढ होत असल्याचे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.
*ग्राफिक्स*
*भाजीपाला प्रति किलो भाव*
*शेवगा -180 ते 200 रू
*भेंडी -90 ते 100 रू
*गवार :- 80 ते 100 रू
*फ्लावर 80 ते 90 रू
*कारले -90 ते 100 रू
*दोडके -80 ते 90 रू
*ढोबळी मिरची 80 ते 90
*वांगे -80 ते 90 रू
*कोबी -70 ते 80 रू
*डाळी प्रति किलो भाव*
*तूर -1 40 ते 150 रु
*मूग -125 ते 140
*उडीद -140 ते 150
*मसूर -115 ते 125
*बेसन पीठ 115 ते 125
*मटण,मांस,मासे प्रति किलो भाव*
*मटण -700 रुपये
*चिकन :-240 ते 260
*मासे :-700 ते 800
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement