Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अर्धा किलोमीटर लांब रिंगण!

TUSHAR TAPASE
Jun 27, 2025 12:33:49
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_RINGAN सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडले. मात्र यावेळी मंदिरापासून तब्बल अर्धा किलोमीटर पुढे या वारीचे रिंगण पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.दिंडींमध्ये मधील पडलेल्या अंतरामुळे दरवर्षी चांदोबाच्या लिंब या मंदिरा समोर होणारे उभे रिंगण अर्धा किलोमीटर लांबल्यामुळे वारकऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.दोन उभ्या रिंगणातून धावणारा झेंडा घेतलेला अश्व हे या रिंगणाचे वैशिष्ट असते.या रिंगणावेळी वारकरी रस्त्याचा दोन्ही बाजूला उभे राहतात आणि मग अश्व या वारकऱ्यांच्या मधोमध धावतो.धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement