Back
सावर्डे येथे भीषण अपघात: कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा मृत्यू!
Ratnagiri, Maharashtra
लोकेशन - सावर्डे चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजिकच्या सावर्डे येथे कंटेनर आणि टू व्हीलर चा अपघात..
कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...
घटनास्थळी पोलीस दाखल..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Amravati, Maharashtra:
Feed slug :– AMT_BAWANKULE_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरशी जोडण्याचा प्रयत्न करू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अँकर :- शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग हा अमरावतीच्या प्रति पंढरपूर असलेल्या कौंढणपूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याच वक्तव्य केला आहे त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहे. शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पर्यंत आला असून वर्धा जिल्ह्या लगत असलेल्या कौंडण्यपूरलाही हा मार्ग जोडण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा पाहायला मिळत आहे. मी लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहे आणि इतर मार्गाने कौंडण्यपुरला शक्तिपीठ महामार्ग कसा जोडता येईल हा प्रयत्न आम्ही करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितला आहे.
बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यातील बेने इस्रायली समाज ......
अँकर - बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील लोक समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग नवगावच्या किनाऱ्यावर आली.
स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही.
बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात.
मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात.
हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत.
बाईट - ए. बी. आवासकर , पुरुष
बाईट - मार्गारेट तळकर, तरुणी
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट आहे
-------
नागपूर
* नागपूरात कचरा उचलणारा ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात
* वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या अपघातात घटनास्थळीच दुचाकी स्वार ठार तर 2 जण गंभीर जखमी..
* नितीन पंजेश्वर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव तर दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
* कचरा संकलन करणाऱ्या ट्रकच्या चालकाला वाहनासह वाठोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत..
Byte हरीश बोराडे, पोलीस निरीक्षक, वाठोडा पोलीस स्टेशन
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, यवतमाळच्या मडकोना ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देऊन, ग्रामस्वच्छता साधण्यासोबतच आर्थिक उन्नती देखील साधली आहे. घनकचरा व्यवस्थापनामुळे गावातील कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचा उद्देश साधण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी वितरित केली, त्यातून ओला आणि सुखा कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येऊन कंपोस्ट खत तयार करण्यात आले या खताच्या विक्रीतून ग्रामपंचायतला आर्थिक उत्पन्न देखील मिळाले.
बाईट : नरहरी हरगुडे सरपंच
सुधीर क्षीरसागर ग्रामपंचायत अधिकारी
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : पेट्रोल पंपा समोरील साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅसचा भीषण स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही...
Anc : शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील एका साउथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. दुपारी किचन रूम मध्ये असलेल्या घरगुती गॅसच्या तीन टाक्याला अचानक आग लागली. आगीत एका टाकीचा भीषण स्फोट झाला. यावेळी हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. जिथे गॅसच्या टाकीचा स्फोट झाला त्याच परिसरात केवळ 100 फुटाच्या अंतरावर पेट्रोल पंप होते. त्यामुळे मोठी हाणी टळली आहे. स्फोटात घरगुती गॅस आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड शहरातील अनेक हॉटेल मध्ये घरगुती गॅस सर्रासपणे वापरण्यात येतात. या स्फोटानंतर हॉटेल व्यावसायिकांकडून अनाधिकृत रित्या गॅस वापराचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2706ZT_WSM_BRIDGE_BROKE_WKT
WSM_BRIDGE_BROKE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी व काच या नदीला पूर आला आहे.या पुरामुळे कुकसा ते मागुळ झनक मार्गावरील अंचळजवळचा पूल वाहून गेला.परिणामी या मार्गावरील वाहतूक २४ तासांपासून ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर उशिरा का होईना, प्रशासनाने रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. दरम्यान, अद्याप वाहतूक पूर्ववत झाली नसून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.याचबाबत अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई
डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ही ठोकल्या बेड्या
आरोपी मध्ये दोन पुरुष एक 21 वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्रा चे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत करत होते एमडी ड्रग्सची तस्करी
हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाणे सह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती
सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहे
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हायप्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली एकदा पुन्हा चर्चेत आली आहे
Byte अतुल झेंडे ( कल्याण dcp )
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2706ZT_WSM_HOTEL_DAMAGE_WKT
WSM_HOTEL_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद व कुकसा परिसरातील उतावळी नदी दुथडी भरून वाहत होती.नदीला पूर आल्याने पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील कुकसा फाट्याजवळील हमीद शाहा यांचे हॉटेल पाण्याखाली गेले.पूराचे पाणी हॉटेलमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.विशेष म्हणजे, हॉटेलमधील मलंग शाहा हे सात ते आठ तास पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र शिरपूर पोलीस व स्थानिक नागरिकांनी धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.हमीद शाहा यांच्या हॉटेलवरच त्यांचा संपूर्ण परिवार अवलंबून होता.आता उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांनी अश्रूंच्या धारा लपवू शकल्या नाहीत. त्यांच्या नुसकानीबाबत हॉटेल चालक शाहा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी ..
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_PATIENT(6 FILES)
जालना | ब्रेकिंग | प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना सोल्युशन जेल ऐवजी अँसिड लावल्याने महिला गंभीर जखमी
नर्स दोन तास फरार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
घटनेनंतर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म,महिला गंभीर भाजल्याने महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार आला समोर
अँकर : जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला सोल्युशन जेल ऐवजी नर्सने अँसिड लावल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.यामुळे महिला गंभीर जखमी झालीय.जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय.शिला भालेराव असं प्रसूतीसाठी दाखल होऊन जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेने गोंडस बाळाला जन्मही दिला आहे. बाळ सुखरूप आहे. मात्र महिलेच्या पोटासह गुप्तांग भाजल्यानं महिलेवर उपचार सुरु आहेत.या महिलेला अँसिडचं इन्फेक्शन झाल्यानं महिला गंभीर भाजली आहे.ग्रामीण रुग्णालयातील ब्रदरने सोनोग्राफी रूम मध्ये औषधाच्या ट्रे मध्ये सोल्युशन जेल ऐवजी अँसिड ठेवल्याने चुकून नर्सकडून अँसिड लागलं असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनाकडून नातेवाईकांना देण्यात आली.मात्र सोनोग्राफी दरम्यान पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर अँसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली असता नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाल्याचा महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.
दरम्यान महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार केले जात आहे. या घटनेने भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे
बाईट:शिला भालेराव जखमी,रुग्ण महिला
बाईट: शिला भालेराव यांच्या सासू
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SARI_ARPAN पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण; बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनी चे पूजन
अँकर :– अमरावतीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वतीने कौंढणपूर येथे 211 मीटर ची अखंड साडी अर्पण करण्याचा सोहळा आयोजित केला होता याला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते यावेळी विदर्भाची पंढरी व माता रुख्मिनीचे महेर असलेल्या श्री. क्षेत्र कौडण्यपूरच्या येथे माता रुक्मिणीला वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे आमदार यांनी बोटीतून नदीपात्रात जात साडी अर्पण केली आहे. दरम्यान बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनीचे पूजनही करण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून श्री क्षेत्र कौडण्यपुराची ओळख आहे. यावेळी जगतगुरु रामराजेस्वराचार्य महाराज यांची उपस्थितीती होती या सोहळ्यात आमदार प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ. दादाराव केचे, आ.सुमित वानखडे यांची उपस्थिती होती.
0
Share
Report