Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

श्रीरामपूरमध्ये पिण्याच्या पाण्यात घाण! नागरिकांचा संताप वाढला!

Kunal Jamdade
Jun 27, 2025 08:09:55
Shirdi, Maharashtra
Anc - श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात थेट घरातील मैला मिश्रीत सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून नगरपरिषदेचे नगर अभियंता अभिषेक मराठे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. VO - अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर एका घृणास्पद आणि संतापजनक घटनेने हादरले आहे.. शहरातील मिल्लतनगर साठवण तलावा शेजारी राहत असलेल्या हनिफशाह शाह, फिरोज पठाण आणि रऊफ शाह राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करत शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फोडून त्यात आपल्या घरातील घाण आणि मैलायुक्त पाणी जाणीवपूर्वक सोडल्याचे घृणास्पद कृत्य निष्पन्न झाल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानंतर नगर अभियंता अभिषेक मराठे यांनी राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला... Bite - अभिषेक मराठे , नगर अभियंता श्रीरामपूर नगरपरिषद VO - श्रीरामपूरातील नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २७९ आणि ३२६ ब नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलीय.. Bite : PI नितीन देशमुख, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे VO - शहरातील लाखो नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचे हे कृत्य केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, माणुसकीच्या नावाखाली केलेले एक घोर पाप आहे. या घटनेमुळे श्रीरामपुरात तीव्र संतापाची लाट पसरली असून अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement