Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये अस्वच्छ पाण्याची पुरवठा, नागरिकांचा संताप वाढत आहे!

GANESH MOHALE
Jun 28, 2025 10:02:44
Washim, Maharashtra
वाशिम:  File:2806ZT_WSM_UNCLEAN_WATER_SUPPLY रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून तोही गढूळ, गाळयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला असून, हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना घरगुती वापरासाठी सुरक्षित.परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई,अपुरा पाणी शुद्धीकरण प्रक्रिया आणि जलवाहिन्यांतील गाळ यामुळे पाणी पुरवठ्याचा दर्जा खालावला आहे.शहरातील अनेक भागांतून अशा निकृष्ट पाण्याच्या तक्रारी सातत्याने येत असूनही नगरपालिकेकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर बाब मानली जात आहे.त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बाईट:रवी वानखेडे,
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement