Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

सालार्जन यांच्या संपत्तीवर भुम्बरे father-son चा हडपण्याचा आरोप!

GAJANAN DESHMUKH
Jun 27, 2025 08:31:22
Parbhani, Maharashtra
अँकर- हैदराबाद संस्थानातील निजाम राजवटीचे त्याकाळचे पंतप्रधान सालार्जन यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी मालकीच्या संपत्ती आहेत, 1958 साली आंध्रप्रदेश येथील उच्च न्यायालयाने त्यांचे जे वारस ठरविले होते. त्यांच्या वारसा पैकी मीर मेहमूद अलीखान व इतरांना वारसदारांना संभाजीनगर शहरातील बागशरजंग येथील 3 एक्कर ही जागा वारसाहक्का हिबाबनामा प्रमाणे मिळाली होती. छत्रपती संभाजी नगर शहरातील बागशरजंग परिसरातील नगर भु मापन क्रमांक 14844 ए मध्ये 25 हजार 784 चौमी आणि 14844 बी मध्ये 14 हजार 487 चौमी येवढी आहे, ज्यांची शासनाच्या रेडीरेकनर दराप्रमाणे 25 हजार 140 रुपये प्रति स्केअर चौरस मीटर असा दर असून सदर जागेचा आजची शासकीय दराने 150 कोटीं एवढी किमंत आहे, सदर जागा ही माजी मंत्री तथा खासदार संदिपान भुम्बरे आणि पैठणचे आमदार विलास भुम्बरे यांनी बळकावल्याचा आरोप परभणी येथील ऍड. मुजाहिद इकबाल खान यांनी केलाय, भुम्बरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूलच्या नावावर सदर जागा केल्याचा आरोप ही यावेळी ऍड. मुझाहिद खान यांनी केलाय. मी 2026 पासून या जागे संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील भूमीअभिलेख कार्यालयात लढत होतो,त्याचा निर्णय आमच्या बाजूने आला आहे. सदर जागा यांनी हडप केली आहे. सालार्जन यांच्या नातेवाईकांनी ऍड. मुझाहिद यांच्याकडे हि केस लढवून जिंकल्या नंतर ऍड. मुजाहिद यांना ती जागा मिळणार होती. पण भुम्बरे यांच्या द्रायव्हरने त्यांना त्या जागेवर जाण्यास मज्जाव केला. यावेळी त्यांना धमकी ही देण्यात आलीय. आपली जागा हडपली हे कळल्यावर ऍड मुझाहिद यांनी संभाजीनागरच्या पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार केलीय. सालार्जन यांच्या नातेवाईकांशी ऍड. मुझाहिद खान यांचा 2016 ऍग्रिमेंग ऑफ सेल, मेमोरम अंडरस्टँडीग आणि कधीही न रद्द होणारा करार झाला आहे, त्यामुळे ऍड. मुझाहिद खान हे या प्रकरण लढवत होते, सलार्जन यांच्या नातेवाईकांना जसे लागलं तसे पैसे दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी भुम्बरे पिता पुत्र अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाईट- ऍड. मुझाहिद खान- तक्रारकर्ते
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement