Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

चिखलदऱ्यात भिमकुंड धबधबा: पर्यटकांची चांगली गर्दी!

ANIRUDHA DAWALE
Jul 03, 2025 03:01:06
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_BHIMKUND_WKT दोन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 चिखलदऱ्यातील भिमकुंड धबधबा प्रवाहित; विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, चिखलदरा हाऊसफुल्ल अँकर :- पावसामुळे विदर्भाचे नंदनवन चिखलदरा निसर्ग सौंदर्याने नटले आहे. तसेच परिसरातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहे. ३ हजार ५०० फुटांवरून वाहणारा भिमकुंड धबधबाही प्रवाहित झाला असून ही मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटक भिमकुंड पॉईंटवर गर्दी करत आहे. उंचावरून वाहणारा पांढऱ्या शुभ्र पाण्याचा हा धबधबा पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी भिमकुंडवर पर्यटकांची गर्दी झाली असून राज्यभरातील अनेक पर्यटक चिखलदऱ्यात हजेरी लावत असल्याने चिखलदरा सध्या हाऊसफुल्ल झाले आहे. दरम्यान या धबधब्याचा उल्लेख महाभारत काळात असून या ठिकाणी विराट राजाचे राज्य होते. ते अज्ञात वासात असताना पांडव वेशांतर करून विराट नगरीत राहायला आले. त्यानंतर महाबली भीमाने किचकाचा वध करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकला आणि भीमाने स्वतःचे रक्तरंजित हात आणि पूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी ज्या कुंडामध्ये स्नान केले ते भीमकुंड नावाने ओळखले जाते अशी आख्यायिका देखील आहे. यंदा पासून या धबधब्याच्या वरून रोप वे आणि सायकलिंग सुरू केल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी WKT
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement