Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड: शेतकऱ्याने डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, प्रशासनाचे दुर्लक्ष!

Mahendrakumar Mudholkar
Jun 30, 2025 11:02:27
Beed, Maharashtra
बीड: तहसीलदार साहेब, शेत जमिनीला रस्ता द्या; हतबल झालेल्या शेतकऱ्याने घेतले अंगावर डिझेल ओतून..! Anc- परळी तालुक्यातील सिरसाळा शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर दहिफळे हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या गट क्रमांक 390 मधील शेतजमिनीला रस्ता मिळावा यासाठी प्रशासन दरबारी मागणी करत होते. मात्र वारंवारच्या दुर्लक्षामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अनर्थ टाळला आणि संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आता जीवावर बेतू लागल्याचे विदारक वास्तव ग्रामीण भागातून समोर येत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement