Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

पडेगावमध्ये रस्ता रुंदीकरणात 600 मालमत्तांवर कारवाई, काय होणार?

VISHAL KAROLE
Jul 03, 2025 02:33:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encroachment av Feed attached शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत आज पडेगाव-मिटमिटा येथील मालमत्तांवर कारवाई होणार आहे. सुमारे ६०० मालमत्ता या रुंदीकरणात बाधित होऊ शकतात. चिकलठाणा, मुकुंदवाडी येथे थेट कारवाई करण्यात आली होती. मात्र या पडेगावात दोन दिवसांपूर्वी मार्किंग करण्यात आली तर भोंगा फिरवून सूचना दिल्याचा दावादेखील मनपाने केला आहे. ६० मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणार असल्याचे मनपाने सांगितले.  पडेगावातील रस्त्याचे सेंटर काढून दोन्ही बाजूने ३० मीटरच्या अंतरापर्यंत मार्किंग करण्यात आली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम होणार आहे. यासाठी ५००हून कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे या कारवाईत २५ पेक्षा अधिक जेसीबीद्वारे कारवाई होईल. पडेगावमध्ये यापूर्वी कचरा डेपो आणि धार्मिक प्रकरणामध्ये दोनदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पूर्ण आढावा घेऊन मनपा आणि पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. ज्यांच्याकडून तणाव निर्माण केला जाऊ शकतो किंवा कारवाईत अडथळा निर्माण केला जाऊ शकतो अशा नागरिकांची यादीच प्रशासनाने काढली आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement