Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

पठाणपुरा मार्गावर खोदकामामुळे चंद्रपूर शहरात वाढलेले अपघात!

ASHISH AMBADE
Jun 27, 2025 07:01:40
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_ROAD_DIGGING ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर वीज वाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त , अपघातांत झाली वाढ अँकर:-- चंद्रपूर शहर खोदापूर झाले आहे. शहरातील विविध भागात या ना त्या विकासकामांमुळे खोदकामे होत आहेत. अशातच पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदकाम सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सततच्या खोदकामामुळे वृद्ध- महिला व शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात भूमिगत मलनिस्सारण वाहिनी ,अमृत पाणीपुरवठा टप्पा दोन यासह आता भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी देखील खोदकामे होत आहेत. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या या कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून रस्ते देखील अरुंद झाले आहेत. हे काम तातडीने थांबवण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. बाईट १),२) त्रस्त नागरिक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement