Back
भद्रावती नगर परिषदेत 50 लाखांची जप्ती! काय आहे संपूर्ण सत्य?
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 3006ZT_CHP_NP_SEIZURE
( single file sent on 2C)
टायटल- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर जप्तीची कारवाई, मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील साहित्य आणि बुलेरो वाहन कोर्टाने मार्फत केले जप्त
अँकर -चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. नगर परिषदेकडून आठ वर्षे थकलेल्या भाडे थकबाकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५० लाख रुपयांच्या थकबाकीच्या अनुषंगाने नगर परिषदेमधील साहित्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.संजय गुंडावार यांच्या मालकीची जागा नगर परिषदेकडून भाडेतत्त्वावर भाजी मार्केटसाठी घेतली होती. दरमहा ६६ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. मात्र, मागील आठ वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे भद्रावती नगर परिषदेकडून भरण्यात आले नाही. संबंधित भाडे आणि व्याज मिळून सुमारे 66 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली.थकबाकी रक्कम वसुलीसाठी गुंडावार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आज 50 लाखाची नगर परिषद कार्यालयात जप्तीची कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सर्व साहित्य, खुर्च्या, संगणक तसेच नगर परिषदेकडे असलेले एक बुलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले.या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
बाईट 1) संजय गुंडावार, तक्रारदार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement