Back
कल्याण कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत १४० उमेदवार, मतदानाची तयारी जोरात!
Kalyan, Maharashtra
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा –संचालक पदाच्या 18 जागेसाठी २९ जून रोजी होणार मतदान, प्रचार शिगेला
१८ पैकी हमाल/माथाडी गटातील १ जागा बिनविरोध;
१४० उमेदवार रिंगणात – महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरस, आमदार-खासदारही प्रचारात उतरले
प्रचाराचा शेवटचा दिवस आल्याने उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढला ... आमचंच पॅनल निवडून येणार सर्व उमेदवारांचा विश्वास
राज्यातील एक प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मतदार राजा काय निर्णय घेतो... कोणाचा गुलाल उधळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे
Anc.. राज्यातील एक प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठीची निवडणूक येत्या २९ जून रोजी पर पडणार आहे. सध्या या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून यंदा या निवडणुकीत एकूण १४० उमेदवार रिंगणात आहेत. हमाल/माथाडी मतदार संघातून शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड झाल्याने आता १७ जागांसाठी मतदान होणार आहे यात शेतकरी सेवा सोसायटी: ११ जागा ,ग्रामपंचायत: ४ जागा ,व्यापारी मतदार संघ: २ जागा ,हमाल/माथाडी: 2 जागा ( एक बिनविरोध) अशाप्रकारे अठरा जागांसाठी ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवार आपला अंतिम टप्प्याचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पॅनलच्या माध्यमातून या बाजार समिती वरती पाहायला मिळाली विशेष म्हणजे या प्रचारात आमदार खासदार देखील उतरलेले पाहायला मिळाले आज या प्रचाराचा शेवटचा दिवस असून 29 जूनला मतदानाची प्रक्रिया असून त्यानंतर मतमोजणी करत उमेदवार विजय घोषित करण्यात येणार आहे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू असून प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे मतदार राजा कोणाला कौल देतो हे रविवारी होणाऱ्या मतदानातून दिसणार आहे.
Byte उमेदवार 1,2,3
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement